Saturday, 8 July 2017

सहपालकमंत्री महादेव जानकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा



उस्मानाबाद.दि.08:-राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे--
सोमवार दि. 10 जुलै 2017 रोजी पहाटे 4.40 वाजता उस्मानाबाद रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सकाळी 8.40 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद कडे प्रयाण. 
सकाळी 09-00 वाजता कर्जमाफी/पिककर्ज आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 10-00 वाजता उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना – सन 2017-18 आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) दुपारी 02-00 वाजता उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने मुंबईकडे प्रयाण.  

परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद, दि.08:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे---
            रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी 04-00 वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व  राखीव. 05वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.06 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.

            सोमवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 09-00 वाजता कर्जमाफी/पिककर्ज आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 10-00 वाजता उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजना – सन 2017-18 आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) दुपारी 02-00 वाजता उस्मानाबाद येथून  शासकीय  मोटारीने  मुंबईकडे  प्रयाण.

Thursday, 6 July 2017

वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे




उस्मानाबाद,दि.4:- पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
                                 जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी जिल्हयातील हतलाई मंदिर परिसर, तुळजापूर खुर्द, कामेगाव,पळसप, कळंब तालुक्यातील निपाणी आदी भागात भेट देवून वृक्ष लागवडीची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक संचालक श्री. मायकलवार, मुख्य वनरक्षक औरंगाबाद श्री. वाघ, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार दिनेश झांपले तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
        हातलाई मंदिर परिसरात वन विभागाने केलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये सन 2001-02 मध्ये या क्षेत्रात वन विभागाने त्यावेळी 15 हेक्टर क्षेत्रात 37 हजार 500, मुख्य रस्ता ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंदीर परिसराच्या बाजूस लॉन तयार करुन, लॉनच्या चोहोबाजूस विविध रंगाच्या क्रोटॉनची लागवड, त्यामध्ये विविध पाम प्रजातींची लागवडीची पाहणी करुन तुळजापूर खुर्द येथे  वन विभागाने 20 हेक्टरवर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लावलेल्या 24 हजार वृक्ष लागवडीची पाहणी केली. त्यानंतर कामेगाव येथील 10 हेक्टर क्षेत्रावर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लागवड केलेल्या 12 वृक्ष लागवडीची पाहणी केली.त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे सन 2014 मध्ये निकृष्ट वनाचे पुर्नवनीकरण योजनेंतर्गत लागवड केलेल्या 37 हजार 500 वृक्ष लागवडीची  पाहणी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केली.यावेळी पळसप येथे लागवड केलेल्या शिसू, काशिद, प्लेटोफार्म, करंज,निम,शिरस महोगणी, बकुळ आदी वृक्षाची चांगली वाढ झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पाहणी केलेल्या सर्व ठिकाणी यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.