Friday, 31 March 2017

उष्ण तापमानात काळजी घ्या


उस्मानाबाद.दि.31:-उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  केले आहे.
          उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करण्याचे सुचविले आहे- तहान लागलेली नसली तरीसुधा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत यंणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, त्यांना पुरेसे पाणी दयावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा, पहाटेच्या वेळी कामे करावीत, गरोदर कामगार  व आजारी कामगाराची अधिक काळजी घ्यावी आदी उपाय करावेत.

हे करु नये – लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाऊ नये, गडत, घट पजाड कपडे घालण्याचे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.  

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक



उस्मानाबाद.दि.31:- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक दि.3 एप्रिल 2017 रोजी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी  कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. 

वाहतुकीचे नियंत्रण व नियमन


उस्मानाबाद.दि.31:-  जिल्ह्यात दिनांक 5 एप्रिल 2017 ते दि.24 एप्रिल 2017 या कालावधीत   जयंती, यात्रा, उर्स आदी उत्सव  साजरे होणार आहेत. हे उत्सव शांततेत पार पडावेत,यासाठी  मिरवणुकांदरम्यान वाहतुकीचे  नियंत्रण  व नियमन करणे आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उत्सवा दरम्यान तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ मात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील  सर्व पोलीस उपनिरीक्षक  व त्यापेक्षा वरिष्ठ  दर्जाचे अधिकाऱ्यांना  अधिकार प्रदान केले आहेत.

 तसेच सडकांवरील  किंवा सडकेने जाणाऱ्या  मिरवणुकीतील किंवा जमावातील  लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची  वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, मिरवणुका कोणत्या मार्गाने  जाव्यात ते मार्ग विहित करणे, प्रतिमा पुजनाच्या वेळी  किंवा लोकांच्या  एकत्र जमण्याच्या  जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण  होण्याची शक्यता  असेल अशा ठिकाणी अडथळा होऊ न देणे , सार्वजनिक ठिकाणी  कर्कश वाद्य वाजविणे यावर नियंत्रण ठेवणे  यासाठी  महाराष्ट्र पोलीस  अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील  सर्व पोलीस उपनिरीक्षक  व त्यापेक्षा वरिष्ठ  दर्जाचे अधिकाऱ्यांना  दिनांक 5 ते 24 एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कळविले आह.