Saturday, 25 March 2017

उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयेाजन


उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांचेकडील 241 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेउन निवड करणार आहेत.
एसबीआय लाईफ  इन्सूरन्स कंपनी ली. उस्मानाबाद  मध्ये ॲडवायजर  पदांची संख्या 30, पात्रता इ.10/12वी किंवा पदवी पास, सन ऍ़ल्यमिनियम  ॲन्ड फॅब्रिकेशन, प्लायग्लास ॲन्ड  हार्डवेअर  बार्शी  नाका, उस्मानाबाद या कंपनीत  अकाउंटटसाठी एक स्त्री, एक पुरूष, पात्रता बीकॉम/ एमकॉम पास, सेल्समन दोन, पात्रता इ. 12 वी पास, पेंटर एक, आयटीआय ट्रेड,  ग्लास  कटर एक, पात्रता  आयटीआय ट्रेड, हेल्पर 4, पात्रता 10 वी पास, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत किल्लारी, ता.औसा जि.लातुर (प्रशिक्षण अनिवार्य)- मेसन 50, पात्रता  इयत्ता 5 वी  किंवा  आयटीआय  मेसन, बार बेंडीग 50, पात्रता इयत्ता 5 वी पास, वेल्डींग 50, पात्रता इयत्त 10 वी  किंवा  आयटीआय  वेल्डर, नर्सींग  सहायक - 50, पात्रता इयत्ता 8 वी पास (फक्त मुलींसाठी) या  सर्व  पदासाठी  वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे अशी राहील.
वेतन  शैक्षणिक  व  पदाच्या योग्यतेनुसार देण्यात येईल कॅन्टीन, निवास, ट्रान्सपोर्टेशन इत्यादी  सोई/सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या  वेळी  कंपनीचे  अधिकारी/उद्योजक  सविस्तर  माहिती  व  मार्गदर्शन करतील.

        शैक्षणिक पात्रतचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्पलॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 02 पासपोर्ट साईझ फोटो इत्यादी. सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स  कॉपीसह  प्रत्यक्ष  जिल्हा  कौशल्य  विकास रोजगार व  उद्योजकता  मार्गदर्शन  केंद्र, मध्यवर्ती  प्रशासकीय  इमारत, तळ मजला, उस्मानाबाद येथे  गुरूवार  दिनांक 30 मार्च 2017 रोजी  सकाळी  11 वाजता  स्वखर्चाने  हजर  राहून खाजगी  क्षेत्रातील  रोजगारांच्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, संपर्कासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र : 02472–222236 वर संपर्क करावा, असे आवाहन  सहायक  संचालक, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार  व  उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र  उस्मानाबाद यांनी केले आहे.

आर.टी.ई.नुसार 25 टक्के मोफत प्रवेश पात्र पालकांनी दि.3 एप्रिल 2017 पर्यंत प्रवेश घ्यावा -सचिन जगताप


                                                            
उस्मानाबाद,दि.25:बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणांतर्गत  दुर्बल  आणि  वंचित घटकांना विनाअनुदानीत  आणि  कायम  विनाअनुदानीत  शाळांमध्ये  किमान 25  टक्के प्रवेश  तरतूद आहे.  त्याप्रमाणे  ऑनलाईनव्दारे  पहिल्या  लॉटरी  मधील  फेरी  क्र.2 नुसार  निवड झालेले किंवा न झालेल्या पालकांना त्यांच्या नोंद केलेल्या मोबाईलवर क्रमांकावर दिनांक 23 मार्च 2017  रोजी  SMS  पाठविण्यात आले आहेत.
 पात्र  पालकांनी   दिनांक 3 एप्रिल 2017  पर्यंत  त्यांच्या  ॲपलिकेशन  नंबर  व  पासवर्ड वापरुन शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या स्वाक्षरीचे ॲडमीट  कार्ड  काढावे  व  सोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे  तहसिलदार  यांचे सन 2015-16 चे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवाशी  पुरावा, रंगीत  फोटो  व  अपंगत्व  असल्यास  प्रमाणपत्र  इत्यादी  कागदपत्र  सादर करुन   निवड   झालेल्या  शाळेत  प्रवेश  घ्यावा.

ज्या  विद्यार्थ्यांची  निवड  झालेली  आहे अशा विद्यार्थ्यांची  यादी  मुख्याध्यापक  यांच्या  लॉगिंनवर  दिसत आहे. दिनांक 3 एप्रिल 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्राची व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्या  स्वाक्षरीचे  ॲडमीट  कार्डची  तपासणी  करुन  सदरील विद्यार्थ्यांस मुख्याध्यापक लाँगीन  वर  जाऊन  कागदपत्रे  पूर्ण  असल्यास  Admitted   म्हणावे, कागदपत्र  पूर्ण  नसल्यास  मुख्याध्यापकांना  दिलेल्या  मुदतीच्या  शेवटच्या  दिवशी Rejected म्हणावे. काही  पालक विहीत  मुदतीत  शाळास्तरावर  प्रवेशासाठी आलेच नाही तर अशा पालकांना मुख्याध्यापकांनी आपल्यास्तरावरुन  दूरध्वनीवरुन   संपर्क  साधावा  तरीही  दिलेल्या मुदतीत  न आल्यास त्यांना  Not Approached  म्हणावे.मुख्याध्यापक  लॉगिंन वर एकही विद्यार्थी Pending राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  सचिन  जगताप  यांनी  केले  आहे.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


उस्मानाबाद, दि.25:- जिल्हयात  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सन 2016 मध्ये एकूण 1 हजार 77  क्षयरूग्ण शोधून उपचार करण्यात आले आहेत.
            या कार्यक्रमांतर्गत  जिल्हा  क्षयरोग  कार्यालय  येथे धन्वंतरी व क्षयरोगाच्या जंतूंचे संशोधक डॉ.राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार हार घालून जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. याप्रसंगी एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते .  या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या हस्ते  हिरवा  झेंडा  दाखविण्यात  आला.
यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले,सहायक संचालक डॉ.खडके,जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे,अधिष्ठाता आयुर्वेद महाविद्यालय श्रीमती डॉ. पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी, माता  व बाल संगोपन अधिकारी के. के. मिटकरी, अतिरिक्त  जिल्हा  आरोग्य  अधिकारी  डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप एन. एन. बोरकर,  अधिकारी डॉ. दीपक पंडीत, जिल्हा रूग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती शेख,श्री. काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनजागरण रॅलीमध्ये शासकीय परिचारिका प्रशिक्षण केद्र, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, शिवाजीराव घोगरे नर्सिंग कॉलेज,जीवनज्योत नर्सिंग कॉलेज,के.टी. पाटील नर्सिंग कॉलेज,बील गेटस नर्सिंग  कॉलेज,येथील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक यांचा सक्रिय सहभाग होता.
जिल्हयातील क्षयरोग  पथके, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य  केंद्रावर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली , रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम  यशस्वी  होण्यासाठी  जिल्हा  क्षयरोग  कार्यालयाचे एन. एच. जोशी, डी. एस. व्हटकर, श्री. साबणे, श्री. चव्हाण, श्रीमती हंचाटे,श्री. नलावडे, श्री. पवार, श्रीमती द्वासे, श्री. काझी यांनी  विशेष  परिश्रम घेतले.