उस्मानाबाद.दि. 17: शासकीय
वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन,
निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न
खात्यात जमा करण्याबाबतची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत
विद्यार्थ्यांकडून समक्ष / टपालाद्वारे कार्यालयाच्या ई-मेल वर अर्ज स्विकृत
करण्यासाठी मुदत दिनांक 23 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात येत आहे,असे सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Saturday, 18 March 2017
जिल्हयात 2 हजार 240 शेततळयांना मंजूरी
उस्मानाबाद,दि. 17:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात
"मागेल त्याला शेततळे" योजने मध्ये 2 हजार 240 शेततळयांना मंजूरी
देण्यात आली आहे. जिल्हयास 3 हजार 700 शेततळयांचा लक्षांक होता.
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी
जिल्हाभरातून 3 हजार 106 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 936 जणांना
तांत्रिकदृष्टया जागा उपलब्ध झाली. आलेल्या सर्व अर्जामधून 2 हजार 240 अर्ज मंजूर
करण्यात आले व कार्यारंभ आदेश देण्यात आले. 2 हजार 151 ही संख्या आखणी करून
दिलेल्या शेततळयाची आहे यापैकी 296 शेततळयाची कामे चालू असून जिल्हयात 258 शेततळयाची
कामे पूर्ण झालेली आहेत.
शासन निर्णयानुसार उस्मानाबाद
जिल्हयास शेततळयासाठी 375.54 लक्ष वितरीत निधी मंजूर झालेला असून अनुदान अदायगी
शेततळयाची संख्या 174 आहे. आज पर्यंत शेततळयासाठी अनूदान अदायगी 69.71 लक्ष रुपये
केले असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
युवक मंडळांनी तालुकास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि. 17:
केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र
कार्यालयाशी सलग्न असणाऱ्या सर्व युवा मंडळ, महिला मंडळांना ग्रामस्वच्छता
अभियानांतर्गत दि. 1 एप्रिल 2016 ते 28
फेब्रुवारी 2017 या कालावधीत उत्कृष्ठ कार्य करणा-या युवक मंडळांना तालुकास्तरावर उत्कृष्ट युवक
मंडळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पुरस्कारासाठी
पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम पुरस्कार रु. 8000/ रोख व गौरवपत्र तर द्वितीय पुरस्कार रु. 4000/ रोख व गौरवपत्र
देण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा विहीर, परिसर स्वच्छता,गाळ
काढणे, खोली वाढविणे, नदीकाठ स्वच्छता मोहीम, गाजर गवत, जलपर्णी काढणे,
वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, स्वच्छता व रंगरंगोटी (शाळा,अंगणवाडी, ग्रामपंचायत),
ग्रामस्वच्छता, मैदान स्वच्छ करणे, पांदी स्वच्छ करणे, पाणी आडविण्यासाठी बंधारे,
शोषखडे तसेच शौचालय बांधकामास प्रवृत्त करणे आदी कामे दि.1 एप्रिल 2016 ते 18
फेब्रुवारी 2017 या कालावधीत ग्रामस्तरावर
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक मंडळ, महिला मंडळांनी दिनांक 22 मार्च 2017 पूर्वी सदरील
पुरस्कारासाठी अर्ज विहीत नमुन्यातील प्रस्ताव नेहरु युवा केंद्र ,मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे दाखल करावेत.
अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.
पुरस्कार प्रस्तावा सोबत दि.1 एप्रिल 2016 ते 18 फेब्रुवारी 2017 या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल, फोटो,
वर्तमान पत्रातील कात्रणे व ग्रामपंचायमचे काम केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे,
इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळांनी दिनांक 22 मार्च 2017 पर्यंत प्रस्ताव सादर
करावेत, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक श्री.काळे यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)