उस्मानाबाद,दि. 17:
केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र
कार्यालयाशी सलग्न असणाऱ्या सर्व युवा मंडळ, महिला मंडळांना ग्रामस्वच्छता
अभियानांतर्गत दि. 1 एप्रिल 2016 ते 28
फेब्रुवारी 2017 या कालावधीत उत्कृष्ठ कार्य करणा-या युवक मंडळांना तालुकास्तरावर उत्कृष्ट युवक
मंडळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पुरस्कारासाठी
पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम पुरस्कार रु. 8000/ रोख व गौरवपत्र तर द्वितीय पुरस्कार रु. 4000/ रोख व गौरवपत्र
देण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा विहीर, परिसर स्वच्छता,गाळ
काढणे, खोली वाढविणे, नदीकाठ स्वच्छता मोहीम, गाजर गवत, जलपर्णी काढणे,
वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, स्वच्छता व रंगरंगोटी (शाळा,अंगणवाडी, ग्रामपंचायत),
ग्रामस्वच्छता, मैदान स्वच्छ करणे, पांदी स्वच्छ करणे, पाणी आडविण्यासाठी बंधारे,
शोषखडे तसेच शौचालय बांधकामास प्रवृत्त करणे आदी कामे दि.1 एप्रिल 2016 ते 18
फेब्रुवारी 2017 या कालावधीत ग्रामस्तरावर
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक मंडळ, महिला मंडळांनी दिनांक 22 मार्च 2017 पूर्वी सदरील
पुरस्कारासाठी अर्ज विहीत नमुन्यातील प्रस्ताव नेहरु युवा केंद्र ,मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे दाखल करावेत.
अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.
पुरस्कार प्रस्तावा सोबत दि.1 एप्रिल 2016 ते 18 फेब्रुवारी 2017 या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल, फोटो,
वर्तमान पत्रातील कात्रणे व ग्रामपंचायमचे काम केल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे,
इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळांनी दिनांक 22 मार्च 2017 पर्यंत प्रस्ताव सादर
करावेत, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक श्री.काळे यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.