उस्मानाबाद.दि.18:-
जिल्ह्यातील माहे मार्च 2017 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची
अंमलबजावणी करण्याकरिता योजनानिहाय अन्नधान्याचे मासिक नियतन मंजूर झाले असून
सदरील नियतनाची योजनानिहाय लाभार्थी संख्यानिहाय अन्यधान्य परिमाण
पुढीलप्रमाणे निर्धारित करण्यात
येत आहे.
प्राधान्य
कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत गहू 3 कि.ग्रॅ. प्रतिव्यक्ती 2 रु.,तांदूळ 2
कि.ग्रॅ.प्रतिव्यक्ती 3 रु., अंत्योदय
योजनेतील लाभार्थ्यांसाठी गहू 21 कि.ग्रॅ.प्रती कार्ड 2 रु., तांदूळ 14
कि.ग्रॅ.प्रती कार्ड 3 रु., एपीएल (केसरी) शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू -3 कि.ग्रॅ
. प्रतीव्यक्ती 2 रुपये, तांदूळ- 2 कि.ग्रॅ प्रतिव्यकी-3 रु., उर्वरीत ए. पी. एल.
साठी अद्याप नियत मंजूर नाही,गहू 10 कि.ग्रॅ. प्रती कार्ड 7.20 रू.,तांदूळ 5 किलो
प्रती कार्ड 9.60 रू., साखर - बी. पी. एल. 500 ग्रॅम दरडोई- 13 रुपये 50 पैसे,
अंत्योदय योजनेंतर्गत साखर 500 ग्रॅम
दरडोई- 13 रुपये 50 पैसे, अन्नपूर्णा 500 ग्रॅम दरडोई -13 रुपये 50 पैसे याप्रमाणे
राहील.
केरोसीनचा विक्रीदर दि. 1 जानेवारी 2017 पासून
पुढीलप्रमाणे आहे- उस्मानाबाद तालुका दर
18 रुपये 94 पैसे प्रति लिटर , तुळजापूर 18 रुपये 82 पैसे, उमरगा -19 रुपये 06
पैसे,लोहारा 18 रुपये 97 पैसे,कळंब -19 रुपये 21 पैसे, परंडा- 19 रुपये 16 पैसे,
भूम-19 रुपये 17 पैसे व वाशी तालुक्यातील दर 19 रुपये 19 पैसे प्रति लिटर राहतील.
उस्मानाबाद जिल्हयासाठी माहे
मार्च 2017 करिता शासनाकडून अन्नधान्याचे नियतन पुढीलप्रमाणे प्राप्त झाले आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी गहू 3 हजार 55 मेट्रीक टन व तांदूळ 2 हजार 37
मेट्रीक टन तसेच अंत्योदय अन्न योजनेसाठी गहू 1 हजार 147 मेट्रीक टन, तांदूळ 236
मेट्रीक टन एवढे धान्य
प्राप्त झाले आहे. सदरील धान्याच्या वाहतुकीबाबतचे आदेश वाहतूक
ठेकेदार गोदामनिहाय देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा
अधिकारी यांनी कळविले आहे.