उस्मानाबाद,दि. 17:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात
"मागेल त्याला शेततळे" योजने मध्ये 2 हजार 240 शेततळयांना मंजूरी
देण्यात आली आहे. जिल्हयास 3 हजार 700 शेततळयांचा लक्षांक होता.
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी
जिल्हाभरातून 3 हजार 106 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 936 जणांना
तांत्रिकदृष्टया जागा उपलब्ध झाली. आलेल्या सर्व अर्जामधून 2 हजार 240 अर्ज मंजूर
करण्यात आले व कार्यारंभ आदेश देण्यात आले. 2 हजार 151 ही संख्या आखणी करून
दिलेल्या शेततळयाची आहे यापैकी 296 शेततळयाची कामे चालू असून जिल्हयात 258 शेततळयाची
कामे पूर्ण झालेली आहेत.
शासन निर्णयानुसार उस्मानाबाद
जिल्हयास शेततळयासाठी 375.54 लक्ष वितरीत निधी मंजूर झालेला असून अनुदान अदायगी
शेततळयाची संख्या 174 आहे. आज पर्यंत शेततळयासाठी अनूदान अदायगी 69.71 लक्ष रुपये
केले असल्याचे अहवालात नमूद केले आहे.