उस्मानाबाद,दि.15:-स्थानिक लोककलावंत,महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना
आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनायाकडून वर्षभर दर शनिवारी
व रविवारी सायंकाळी 7.00 ते 8.30 या वेळेत शहरात कलांगण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उस्मानाबादकरांना
सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.यामध्ये स्थानिक लोककला, महाराष्ट्राची
संस्कृती, देशप्रेमावर आधारीत गीत गायन, नृत्य,वाद्यवादन,एकपात्री अभिनय अशा
विविध कला सादर करण्याची संधी स्थानिक कलावंताना देण्यात येणार आहे.
कलांगण कार्यक्रम बार्शी नाका, जिजाऊ चौक, उस्मानाबाद या ठिकाणी दर शनिवारी व
रविवारी सायं.7.00 ते 8.30 यावेळेत आयोजित केला जाणार आहे.
तरी इच्छुक कलावंतानी सादरीकरणासाठी जिल्हा समन्वयक श्री. सचिन मोरे मो.
9175345555 व अजय चिलवंत मो. नं. 8888574324 याक्रमांकावर संपर्क साधावा
असे आवाहन करण्यात आले आहे.