Thursday, 9 February 2017

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रास उत्कृष्ट प्रतिसाद हॉकी, फुटबॉल , कुस्ती खेळाचे प्रशिक्षण शिबिरास सुरवात


उस्मानागाद.दि.9:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद  आयोजित हॉकी, फुटबॉल, कुस्ती, खेळांच्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे उद्घाटन दि. 6 फेबुवारी 2017 रोजी सांय. 5.30 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि  प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा हॉकी / फुटबॉल संघटननेचे सचिव श्री. जावेद शेख व प्रा. रवि चव्हाण, वाशी तालुका यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे  करण्यात आले.
 याप्रसंगी  हॉकी, फुटबॉल, कुस्ती खेळाचे मिळुन एकुण 180 प्रशिक्षणार्थी शिबिरास सहभागी आहेत. ही प्रशिक्षण शिबीर  दि 6 ते 15 फेबुवारी,2017 या कालावधीत  सकाळी व संध्याकाळी दोन्ही सत्रात  सुरु आहे.  प्रशिक्षणार्थींना संपूर्ण अद्यावत क्रीडा साहित्य, सकाळी  पोष्टिक आहार दिला जात आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी  सांगितले आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. जावेद शेख यांनी  खेळाडूंनी जिद्दीने सराव केल्यास यश नक्कीच मिळते असे सांगितले. या प्रशिक्षण शिबिरासाठी  राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक, फुटबॉल- श्री. एम.झेङ शेख, हॉकी- श्री. झेङ आय. कुरेशी, कुस्ती - श्री. एस. एम. वांजळे  यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जात आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा गरजूंनी लाभ घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी –सुनिल यादव



उस्मानागाद.दि.9:- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम एम.डी.ए.2016-17 अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय, उस्मानाबाद यांनी  दि.10 ते 14 फेब्रुवारी 2017 या दरम्यान आयोजित केलेल्या सामुदायिक हत्तीरोग नियंत्रण औषधोपचार मोहिमेचा जिल्हयातील गरजू जनतेनेही लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांनी केले.
                 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एम.डी.ए. जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ.विजय भराटे, डॉ.विद्या शिंदे, महिला व बालविकास चे   श्री. शहापूरकर, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                   या  हत्तीरोग  नियंत्रण कायर्यक्रम  यशस्वीतेसाठी  ग्रामीण भागात जिल्हास्तरीय 5 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 97 पर्यवेक्षक व 1 हजार 914 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरी भागात जिल्हास्तरीय 3 अधिकारी, तालुकास्तरीय 8 अधिकारी, 11 पर्यवेक्षक व 214 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जबाबदार वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्हयाची लोकसंख्या 17 लाख 56 हजार 352 असून अपेक्षीत लाभार्थी 16 लाख 33 हजार 408 आहेत. या कामासाठी स्वयंसेवक, कर्मचारी (दोन कर्मचारी एक टीम) 2 हजार 128 आहेत व पर्यवेक्षक (20 कर्मचारी 1 पर्यवेक्षक ) असे एकूण 108 अधिकारी/कर्मचारी  स्वयंसेवक आहेत.

              प्रारंभी  जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण  कार्यक्रमाची  रुपरेषा  विशद  केली  व शेवटी  उपस्थितांचे  आभार  मानले. 

जिल्हयात कॅशलेसबाबत युवक देणार नागरिकांना प्रशिक्षण


उस्मानाबाद. दि.8:-  जिल्हयातील नागरिकांनी  कॅशलेस व्यवहारावर भर दयावा, यासाठी जिल्हयातील एनएसएनच्या युवकाकडून नागरिकांना कॅशलेसबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 जिल्हयातील एनएसएनच्या युवकांच्या 24 संस्थांच्या प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात येणार आसून, यातील युवकांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.जी टिम अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुवर्णपदक   व राज्यशासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती परिविक्षाधिण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

 मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात सोमवार दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजीत 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयुष प्रसाद म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील यवतमाळ व उस्मानाबाद या दोन जिल्हयाची 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' साठी निवड केली आहे. यवतमाळ येथील कामकाज सुरू झाले आसून, उस्मानाबादेत ही दोन आठवडयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर मोठया शहरामधील नागरिकांनी आता कॅशलेस व्यवहारावर मोठा भर दिला आहे. या व्यवहारामध्ये ग्रामिन भागातील नागरिक मागे राहू नयेत, यासाठी 'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' हाती घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत असलेले गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासाठी जिल्हयातील  24 संस्थांमधील एनएसएनच्या युवकांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेला 15 ते 20 युवकांची एक या प्रमाणे दोन टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार होणाऱ्या टीमला मंत्रालयातील तीन मुख्य ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. यात विविध बँकाची ऑनलाईन  व्यवहार, शासनाचे भिम ॲप व इतर कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तयार होणाऱ्या   टीमपैकी जी टीम    सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचेल त्या टीमला जिल्हाधिकारी यांचे सुवर्णपदक मिळणार आहे. तर राज्य शासनाकडून प्रमाणपत्रही मिळणार असल्याचे प्रसाद     यावेळी म्हणाले.