Tuesday, 27 December 2016

रॅण्डम केबल सर्वेक्षण सोडत


उस्मानाबाद.दि.27:-जिल्हयातील बहुविध यंत्रणा परिचालक (मल्टीसिस्टीम ऑपरेटर MSO) आणि स्थानिक केबल परिचालक (लोकल केबल ऑपरेटर LCO) यांची विनाक्रम (रॅण्डम पध्दतीने) सर्वेक्षण करण्यासाठी सोडत काढावयाची आहे.त्या दृष्टीने औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हयातील एक मल्टीसिस्टीम ऑपरेटर आणि केबल परिचालक यांचे सर्वेक्षणाकरीता निवडीचे कामकाज दि.7 जानेवारी 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे केले जाणार आहे. ही सोडत झाल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या सोडतीस  मल्टीसिस्टीम ऑपरेटर व केबल परिचालक यांनी उपस्थित रहावे, असे उपायुक्त (करमणूक शुल्क), औरंगाबाद यांनी कळविले आहे.

                                           ***** 

गायी/म्हशीमध्ये मास कृत्रिम रेतन


उस्मानाबाद,दि.27:- पशुसंवर्धन विभागाच्या स्थापनेस 125 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या विभागामार्फत जिल्हयातील सर्व प्रजननक्षम गायी/म्हशीमध्ये मास कृत्रिम रेतन दि.26 डिसेंबर 2016 ते दि.26 जानेवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पशुंची प्रजनन क्षमता व उत्पादकता वाढीसाठी प्रात्याक्षिके व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
तरी शेतकरी, पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.  

                              ******

माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर अनुभव लेखन स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा-2016


उस्मानाबाद,दि.27:- माहिती अधिकार कायद्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती व्हावी,शासनव्यवस्थेत माहीतगार  नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पारदर्शक प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत माहिती अधिकार वापराचे,अंमलबजावणीचे अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
            माहिती अधिकाराचा समाजहितासाठी उपयोग करताना आलेले चांगले अनुभव, तसेच प्रतिकूल अनुभव यासाठी अनुभव लेखन स्पर्धेसाठी विषय       1)माहिती अधिकार अर्ज व अनुषंगिक उपलब्ध माहिती आणि माहितीचा उपयोग, 2) महाराष्ट्र शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन 2005 आणि माहितीचा अधिकार अधिनियमन-2005 3) माहिती अधिकार अधिनियमन कलम 4 चे प्राधिकरणाने करावयाचे स्वयंप्रकटीकरण सद्य:स्थिती.

 निबंध लेखन स्पर्धेसाठी विषय 1) माहितीचा अधिकार अधिनियमन-2005 चा  वापर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संदर्भ तुलनात्मक आढावा,         2) डिजिटल इंडिया (माहिती तंत्रज्ञान) पार्श्वभूमीवर माहिती अधिकार 2005    3) माहिती अधिकार अधिनियमन 2005 संबंधित परिणामकारक महत्वाचे न्यायनिवाडे इत्यादी. स्पर्धेकरीता 1 हजार शब्दांपर्यंत हस्तलिखित अथवा टंकलिखित केलेले अनुभव व निबंध स्विकारले जातील. आपले अनुभव लेखन व निबंध लेखन दि.15 जानेवारी 2017 पर्यंत प्रकल्प अधिकारी, माहिती अधिकार केंद्र, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे-411007 येथे पाठवावेत. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.yashada.org या संकेतस्थाला भेट द्यावी किंवा (020) 25608130 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन संचालक , माहिती अधिकार केंद्र तथा निबंधक  यशदा श्री. मिलिंद टाकसाळे यांनी केले आहे.                                      *****