Saturday, 15 October 2016

उस्मानाबाद जिल्हयात वनराई बंधारे अभियानाचा शुभारंभ

     




उस्मानाबाद.दि.14:-  वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून जिल्ह्यात शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करण्यासाठी वनराई बंधारे अभियानाचे घाटंग्री येथे दि.15 ऑक्टोबर 2016 रोजी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. आनंद रायते यांच्या हस्ते वनराई बंधारे बांधून शुभारंभ करण्यात आला.

              उस्मानाबाद जिल्हयात गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील अनेक प्रकल्प, ओठे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे हे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषद व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा शुभारंग घाटंग्री येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर गुंड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरिष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टि.एस. देवकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकने, गटविकास अधिकारी चकोर, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संजय आमले, तलाठी दिनेश बहिरमल आदीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. हे अभियान दि.15 ते 23 ऑक्टोबर 2016 याकालावधीत जिल्हाभर राबविले जाणार असून गेल्या दोन वर्षात दोन हजार 655 वनराई बंधारे बांधून लिमकावर्ड बुक मध्ये नोंद झाली होती यावर्षी त्यापेक्षा जास्त  पाच हजार व वनराई बंधारे बांधून लिमका बुक मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या वर्षी बांधलेल्या पाच हजार वनराई बंधाऱ्यारत 250 द.ल.घ.फूट पाणीसाठा होऊन कमीत कमी तीन हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येऊन  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा सुटण्यास मदत होणार आहे, त्याचबरोबर   जिल्हा टँकर मुक्त, टंचाई मुक्त व दुष्काळ मुक्त होण्यास मदत होणार आहे असे, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना अभिवादन




उस्मानाबाद,दि.15:-माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.त्यांचा हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकार यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.  

Friday, 14 October 2016

वाढदिवसाचे औचित्य साधले शंभरांना “लोकराज्य” सदस्य केले


उस्मानाबाद.दि.14 – सध्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. “लोकराज्य” हे मासिकही असेच  एक माध्यम. “सर्वमान्य लोकमान्य” असे हे शासनाचे मुखपत्र, सर्वांनाच हवेहवेसे वाटते. चांदयापासून बांदयापर्यंत, तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे मासिक घराघरापर्यंत पोहोचविण्याकरिता माहिती व जनसंपर्क विभाग जोमाने काम करीत आहे.
            आजकाल लोकसहभागातून अनेक शासकीय योजना, अभियाने यशस्वी होत असल्याचे सकारात्मक चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.असेच चित्र उस्मानाबाद जिल्हयातही “लोकराज्य” च्या  बाबतीत दिसून येत आहे. राज्यातील पहिले लोकराज्यग्राम,पहिली लोकराज्यशाळा, पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय,पहिले लोकराज्य जीवन विमा योजना कार्यालय, पहिले लोकराज्य कृषी विज्ञान केंद्र, पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था, पहिली लोकराज्य मोबाईल रिपेअरिंग बॅच, पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग, पहिले लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र, अशा वैविध्यपूर्ण पध्दतीने “लोकराज्य” मासिकाचा प्रचार व प्रसार  उस्मानाबाद जिल्हयात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने धडाक्यात सुरु आहे.
शासनाच्या अशा या प्रयत्नांना उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 100 सामाजिक कार्यकर्त्यांना व पक्ष कार्यकर्त्यांना “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व  भेट  म्हणून दिले आहे.त्यांनी नुकताच 100 सभासदांच्या  वार्षिक सभासदत्व शुल्काचा धनादेश जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी श्री. नितिन काळे म्हणाले की, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहका-यांच्या सहकार्याने समाजोपयोगी, सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दलचे लेख स्वरूपातील विवेचन,विविध योजनांचे माहितीपर लेख “लोकराज्य”च्या  माध्यमातून गावागावात पोहोचायला हवेत, त्याकरिता आधी सामाजिक कार्यकर्ते,पक्ष कार्यकर्ते हे स्वत: योजनांच्या बाबतीत साक्षर व्हायला हवेत, हाच उद्देश डोळयांसमोर ठेवून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्य करणाऱ्या ,पक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना “लोकराज्य” चे वार्षिक सभासद करुन घेतले आहे.
ते पुढे म्हणाले, मला खात्री आहे की, हे कार्यकर्ते शासनाच्या योजना,त्यांचे महत्तव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील. माझा हा वाढदिवस ख-या अर्थाने सार्थक झाल्याचे मला मनोमन वाटते व मी त्याकरिता या उपक्रमाची माहिती मला दिल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप  यांचा आभारी आहे.

            या निमित्ताने श्री. काळे यांनी उस्मानाबादकरांना आवाहनही केले आहे की, त्यांनी मोठया संख्येने “लोकराज्य” मासिकाचे सभासदत्व स्वीकारावे, शासकीय योजना जाणून घेण्यासाठी या मासिकाचे नियमित वाचन करावे, शासनाच्या योजनांचा स्वत: अभ्यास करावा, इतरांनाही त्याची माहिती दयावी त्यातून गावाचा शहराचा विकास साधावा, स्वावलंबी व्हावे आणि आपल्या उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेला,दुष्काळी,आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती कायमची पुसून टाकावी.