उस्मानाबाद.दि.14 – सध्या शासकीय
योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. “लोकराज्य” हे मासिकही असेच एक माध्यम. “सर्वमान्य लोकमान्य” असे हे शासनाचे मुखपत्र, सर्वांनाच हवेहवेसे वाटते. चांदयापासून
बांदयापर्यंत, तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे मासिक घराघरापर्यंत
पोहोचविण्याकरिता माहिती व जनसंपर्क विभाग जोमाने काम करीत आहे.
आजकाल लोकसहभागातून अनेक शासकीय योजना, अभियाने यशस्वी होत
असल्याचे सकारात्मक चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.असेच चित्र उस्मानाबाद
जिल्हयातही “लोकराज्य” च्या बाबतीत दिसून येत आहे. राज्यातील पहिले लोकराज्यग्राम,पहिली
लोकराज्यशाळा, पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय,पहिले लोकराज्य जीवन विमा
योजना कार्यालय, पहिले लोकराज्य कृषी विज्ञान केंद्र, पहिली लोकराज्य महिला
सामाजिक संस्था, पहिली लोकराज्य मोबाईल रिपेअरिंग बॅच, पहिला लोकराज्य शेतकरी
प्रशिक्षण वर्ग, पहिले लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र, अशा वैविध्यपूर्ण पध्दतीने “लोकराज्य” मासिकाचा प्रचार व
प्रसार उस्मानाबाद जिल्हयात जिल्हा माहिती
कार्यालयाच्या वतीने धडाक्यात सुरु आहे.
शासनाच्या
अशा या प्रयत्नांना उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे
प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 100
सामाजिक कार्यकर्त्यांना व पक्ष कार्यकर्त्यांना “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व भेट
म्हणून दिले आहे.त्यांनी नुकताच 100 सभासदांच्या वार्षिक सभासदत्व शुल्काचा धनादेश जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी श्री.
नितिन काळे म्हणाले की, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील
सर्व सहका-यांच्या सहकार्याने समाजोपयोगी, सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय
घेत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दलचे लेख स्वरूपातील विवेचन,विविध योजनांचे माहितीपर
लेख “लोकराज्य”च्या माध्यमातून गावागावात पोहोचायला हवेत, त्याकरिता
आधी सामाजिक कार्यकर्ते,पक्ष कार्यकर्ते हे स्वत: योजनांच्या बाबतीत साक्षर
व्हायला हवेत, हाच उद्देश डोळयांसमोर ठेवून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक
कार्य करणाऱ्या ,पक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना “लोकराज्य” चे वार्षिक सभासद करुन
घेतले आहे.
ते पुढे
म्हणाले, मला खात्री आहे की, हे कार्यकर्ते शासनाच्या योजना,त्यांचे महत्तव जास्तीत
जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील. माझा हा वाढदिवस ख-या अर्थाने सार्थक झाल्याचे मला
मनोमन वाटते व मी त्याकरिता या उपक्रमाची माहिती मला दिल्याबद्दल जिल्हा माहिती
अधिकारी श्री.सानप यांचा आभारी आहे.
या निमित्ताने श्री. काळे यांनी उस्मानाबादकरांना आवाहनही
केले आहे की, त्यांनी मोठया संख्येने “लोकराज्य” मासिकाचे सभासदत्व स्वीकारावे, शासकीय योजना जाणून घेण्यासाठी या मासिकाचे
नियमित वाचन करावे, शासनाच्या योजनांचा स्वत: अभ्यास करावा, इतरांनाही त्याची
माहिती दयावी त्यातून गावाचा शहराचा विकास साधावा, स्वावलंबी व्हावे आणि आपल्या
उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेला,दुष्काळी,आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी ओळख
आहे ती कायमची पुसून टाकावी.
