“आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती
केंद्र”
उस्मानाबाद,दि,10:- राज्य शासनाच्या “लोकराज्य”
मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या “आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र
” या उपक्रमास
प्रतिसाद देत येरमाळा येथील येडाई
व्यसनमुक्ती केंद्राने राज्यातील पहिले “लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र ” होण्याचा
बहुमान पटकाविला आहे. याकरिता या व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, यश मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच राज्य व्यसनमुक्ती
संघटनेचे सचिव डॉ. संतोष तांबारे यांनी विशेष पुढाकार घेतला.
त्यांनी या व्यसनमुक्ती केंद्रातील 100 रुग्ण
आणि व्यक्ती यांना “लोकराज्य”चे
वार्षिक सभासद करुन घेतले.
या व्यसनमुक्ती केंद्रातील महात्मा गांधी
व्यसनमुक्ती सप्ताहाच्या समारोप प्रसंगी
व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्नशील
असणाऱ्या रुग्णांना प्रोत्साहनपर
व्याख्यान देण्याकरिता जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या
केंद्रात उपस्थित होते .
“लोकराज्य”
मासिकाचे महत्व पटवून
देताना श्री. सानप म्हणाले, “लोकराज्य” या मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या
माहितीचा निश्चित उपयोग या रुग्णांना होणार
आहे. या व्यसनमुक्त व्यक्तींना पुढील आयुष्याच्या यशस्वी वाटचालीकरिता “लोकराज्य” मासिकाचा नक्कीच फायदा होईल , त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींनी लोकराज्यचे
नियमित वाचन करावे , असे आवाहन श्री. सानप
यांनी या व्यसनमुक्ती केंद्रातील
रुग्णांना केले.
राज्यातील पहिले “लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र”
बनण्याचा संकल्प बनल्यानंतर डॉ. संतोष
तांबारी , त्यांचे सहकारी आणि व्यसनमुक्ती
केंद्रातील रुग्णांनी या व्यसनमुक्ती केंद्रात आता यापुढे दररोज “लोकराज्य” मासिकातील एक लेख वाचला जाईल अशी प्रतिज्ञा केली.
.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून येरमाळा येथील सहायक पोलीस
निरीक्षक सचिन चव्हाण , डॉ. सारीपुत भोसीकर , डॉ. भागवत राऊत हे उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजिनाथ शेरकर
यांनी केले तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले . ***