शारदीय
नवरात्र महोत्सव-2016
उस्मानाबाद,
दि. 10:-शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदिरात वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. या सर्व धार्मिक
विधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे आणि
त्यांच्या पत्नी सौ.प्रियंका नारनवरे यांनी पूर्ण केले.विधीवत पूजेनंतर या होमास पुर्णाहुती
देण्यात आली. सप्तपदीपाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पुर्णाहुती देण्याची
प्रथा आहे. त्यानुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.
यावेळी सुनित उर्फ बंडू गणेश पाठक (सरकारी उपाध्ये), ऋषिकेश
दादेगावकर,अनंताचार्य कांबळे, नागेश अम्बुलगे, राजन पद्माकर पाठक, सुमेध
सुनिल पाठक, धनंजय सुधाकर पाठक, विश्वनाथ ढोले, अशोक घाडगे, विश्वनाथ राजाराम
प्रयाग, मकरंद कमलाकर प्रयाग, भालचंद्र रामचंद्र पाठक, श्रीराम अपशिंगेकर, किशोर
दासराव कुलकर्णी, बाळासाहेब दीक्षीत, गजानन भानूदास लसणे, मंगेश नारायण घंटे,
सिलोत्तम जेवळीकर, गिरीष देवळालकर, बाळासाहेब कराडे, सुनिल दुर्गादास लसणे, सुरेश
लक्ष्मण पाठक, अशोक पाठक, प्रल्हाद पैठणकर यांनी मंत्रोचारात हे सर्व विधी पूर्ण करून
केले.