उस्मानाबाद.दि.14:- वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून जिल्ह्यात
शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करण्यासाठी वनराई बंधारे अभियानाचे घाटंग्री येथे
दि.15 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते
यांच्या हस्ते वनराई बंधारे बांधून शुभारंभ करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हयात गेल्या
चार-पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील
अनेक प्रकल्प, ओठे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे हे पाणी वाहून
जात असल्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषद व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा
शुभारंग घाटंग्री येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.
सुधाकर गुंड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरिष बनसोडे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी
अभियंता श्री. टि.एस. देवकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकने, गटविकास
अधिकारी चकोर, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संजय आमले, तलाठी दिनेश बहिरमल
आदीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित
होते. हे अभियान दि.15 ते 23 ऑक्टोबर 2016 याकालावधीत जिल्हाभर राबविले जाणार असून गेल्या दोन
वर्षात दोन हजार 655 वनराई बंधारे बांधून लिमकावर्ड बुक मध्ये नोंद झाली होती
यावर्षी त्यापेक्षा जास्त पाच हजार व
वनराई बंधारे बांधून लिमका बुक मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या
वर्षी बांधलेल्या पाच हजार वनराई बंधाऱ्यारत 250 द.ल.घ.फूट पाणीसाठा होऊन कमीत कमी तीन हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली
येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा सुटण्यास
मदत होणार आहे, त्याचबरोबर जिल्हा टँकर
मुक्त, टंचाई मुक्त व दुष्काळ मुक्त होण्यास मदत होणार आहे असे, यावेळी जिल्हा
परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी सांगितले.



