उस्मानाबाद,दि
14:- राज्यस्तरीय शालेय फुटबॉल व सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा वयोगट 14,17 व
19 वर्षाखालील मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा
स्टेडिअम उस्मानाबाद येथे दि. 19 ते 28 ऑक्टोबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात
आली आहे.
दि. 21 ऑक्टोबर 2016 रोजी सिकई मार्शल आर्ट
स्पर्धेचे उदघाटन पुष्पक मंगल कार्यालय येथे होणार आहे तर समारोप दि. 22 ऑक्टोबर
2016 रोजी होणार आहे, फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन श्री. तुळजाभवानी जिल्हा
स्टेडियमवर दि. 23 ऑक्टोबर 2016 रोजी तर समारोप दि. 28 ऑक्टोबर 2016 रोजी होणार
आहे.
या
स्पर्धेसाठी सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत वयोगट 14,17 व 19 वर्षांखालील एकूण
512 खेळाडू सहभागी होणार असून 98 संघ व्यवस्थापक
उपस्थित राहणार आहेत. तर फुटबॉल स्पर्धेत संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्य
असे एकूण 1 हजार 380 खेळाडू व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.
सिकई
मार्शल आर्ट या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा
गोवा व दिल्ली तर फुटबॉल स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना इंफाळ,
श्रीनगर,पोर्टब्लेअर येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार आहे.