उस्मानाबाद,दि.14:-सायबर
गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व गुन्ह्यांचा तपास गतीमान पद्धतीने करण्यासाठी एक
महत्वाकांक्षी पाऊल म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यात एकाचवेळी 44 सायबर फॉरेन्सीक लॅब
सुरु करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाच्या या अत्याधुनिक लॅबचे लॅबचे उद्घाटन
सोमवार 15 ऑगस्ट 2016 रोजी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर
यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ज्ञान
क्षेत्रातील तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी
या सायबर लॅब सूसज्ज करण्यात आल्या आहेत. उस्मानाबादमधील ही सायबर लॅब मुंबई मुख्यालयाशी
जोडण्यात आलेली असून त्याद्वारे 24 तास सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवता
येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे इंटरनेटशी संबंधित गुन्हे उदा.
आर्थिक गुन्हे, ऑनलाईन बँक गुन्हे,
सोशल मिडियावरील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच
सायबर गुन्ह्यांचा जलद व गतीमान तपास करण्याकरीता त्यांचा वापर करता येणार आहे. या लॅबमुळे उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलही आणखी सक्षम
आणि अत्याधुनिक होणार आहे. Sunday, 14 August 2016
पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.12:- पशुसंवर्धन,दुग्धविकास व
मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे उस्मानाबाद जिल्हयाच्या
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार दि.15 ऑगस्ट रोजी
सकाळी 5.00 वाजता उस्मानाबाद रेल्वेस्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे
प्रयाण.सकाळी 5.30 वाजता उस्मानाबाद शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.00
वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी
8.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी 9-05 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी 10.00 वाजता सायबरक्राईम
कार्यालयाचे उद्घघाटनास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता पशुसंवर्धन,दुग्धविकास व
मत्स्यविकास विभागाची आढावा बैठक (स्थळ शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद). दुपार 2.00
ते 3.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.00 वाजता शेळी संशोधन
केंद्रास भेट(उस्मानाबाद).
दुपारी 4.00 वाजता उस्मानाबाद शेळी
संशोधन केंद्राकडून तुळजापूरकडे प्रयाण .दुपारी 4.30 वाजता शासकीय
विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता तुळजापूर येथून
उसमानाबादकडे प्रयाण. सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन
व राखीव. रात्रौ 11.30 वाजता उस्मानाबाद येथून लातूर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. Saturday, 13 August 2016
“सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशन” झाली राज्यातील पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था
उस्मानाबाद
दि.13:- उस्मानाबाद जिल्हयात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही अंशी वाढले होते मात्र आता शासनाच्या विविध
प्रयत्नांमुळे या संकटावरही उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने मात केली. याचीच प्रेरणा
घेवून 2015-16 या वर्षात एका संवेदनशील महिला संपादिकेने आत्महत्याग्रस्त शेतक-याची विधवा पत्नी आणि त्याच्या कुटुंबासाठी
काहीतरी सामाजिक मदत करण्याचा संकल्प केला आणि त्याच प्रयत्नातून स्थापन झाली “सेव्ह फार्मर्स विडोज फाउंडेशन” ही 100 टक्के
महिलांनी महिलांसाठी चालविलेली महिला सामाजिक संस्था. या महिला संपादिकेचे नाव आहे
श्रीमती शीला उंबरे (पेंढारकर).
शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा शेतकरी पत्नी आणि त्याच्या कुटुंबासाठी
मिळवून देण्यासाठी श्रीमती उंबरे प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नातून जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याशी त्यांनी या महिलांना शासनाच्या
योजनांच्या अभ्यासासाठी आणखी काय करावे लागेल असे विचारले. त्यावर जिल्हा माहिती
अधिकरी सानप यांनी त्यांना लोकराज्य या मासिकाबाबत सविस्तर माहिती दिली, मार्गदर्शन
केले आणि त्यातून ही संस्था 100 टक्के लोकराज्यमय करण्याचा निर्णय झाला.
लागलीच अध्यक्ष श्रीमती शीला उंबरे, उपाध्यक्ष डॉ. दीपिका सस्ते,
नंदा पुलगडे, प्रिया गायकवाड, श्यामल उंबरे, शोभा बेदमुथा या पदाधिका-यांनी जिल्हा
माहिती अधिकारी श्री. सानप यांच्याकडे एकूण 250 महिला सदस्यांच्या “लोकराज्य” सभासदत्वाकरिता रूपये पंचवीस हजारांचा धनादेश
सुपूर्द केला. अशा प्रकारे ही संस्था राज्यातील सर्वात पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था बनली. संस्थेने
यावेळी संकल्प केला की, संस्थेच्या प्रत्येक बैठकीत लोकराज्यातील लेखांचे नियमित वाचन
केले जाईल आणि या गरजू विधवा महिलांना शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देण्यात
येतील.
याप्रसंगी श्रीमती उंबरे यांनी या
माध्यमातून जनतेला उस्मानाबादमधील या शेतकरी विधवा पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या
मदतीकरिता पुढे यावे,त्यासाठी 9881633106 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा तसेच
शासकीय योजनांच्या माहितीकरिता लोकराज्य या मासिकाचे जास्तीत जास्त संख्येने सभासद
व्हावे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या
महान्यूज या वेबपोर्टलला भेट दयावी,तसेच जय महाराष्ट्र व दिलखुलास हे
कार्यक्रम आवर्जून पाहावे व ऐकावेत असे आवाहन केले.
Subscribe to:
Posts (Atom)
