Saturday, 21 September 2019

शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन होण्यासाठी योग्य नियोजन करा -जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


वृत्त क्रमांक 641                                                               दि.21 सप्टेंबर, 2019

शारदीय नवरात्र महोत्सवात येणाऱ्या सर्व
भाविकांना दर्शन होण्यासाठी योग्य नियोजन करा
-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

         उस्मानाबाद,दि.21 (जिमाका) : तुळजापूर येथे दरवर्षी होणाऱ्या श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रासह  कर्नाटक, तेलंगणा राज्यांतून लाखोच्या संख्येने भाविक येतात. या भाविकांना दर्शन सुलभरित्या मिळाण्यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
     तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासन कार्यालयाच सभागृहात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बोलत होत्या.
यावेळी   श्री.बापूसाहेब कन्हे,तुळजापूर नगराध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, उपविभागीय अधिकारी (महसुल) रामेश्वर रोडगे, तहसिलदार तथा व्यवस्थापक श्रीमती योगीता कोल्हे, आपत्ती व्यवस्थापक श्रीमती तेलोरे, श्री.तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री सज्जनराव सांळूके, अमर कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंतराव कोडो, तुळजाभवनी मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक इन्तुले,कार्य यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यावेळी म्हणाल्या की, शारदीय नवरात्र महोत्सवात राज्यासह परराज्यातून मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे येतात. येणाऱ्या भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे याकरीता सुरक्षा यंत्रणासह सर्व संबंधत विभागांनी योग्य नियोजन करावे. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहनतळ, अग्निशमन वाहन, विद्युत व्यवस्था आदी बाबींचे नियोजन करावे. महोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणे तात्काळ काढावीत. भाविकांसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. तसेच प्रसादाच्या पॅकिंग,लाह्या, पेढेसह सर्व प्रकारच्या अन्नाच्या नमुन्याची वेळोवेळी तपासणी करावी. कुंकवाचे तपासणी नमुने घ्यावेत व भेसळयुक्त विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी वैधमापन व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे, अशा सूचना यावेळी श्रीमती मुधोळ यांनी यावेळी दिल्या.           
एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय करुन त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देण्यात याव्यात. पोलीस विभागाने महोत्सवाच्या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. यावेळी श्रीमती मुधोळ यांनी दिल्या.
            नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक वाहनाने येतात.  त्याकरीता पार्किंगची व्यवस्था, एसटी महामंडळाने बसेसची व्यवस्था, आरोग्य विभाग, नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस विभाग, महावितरण कंपनी आदी विभागानी केलेल्या नियोजनाचा व इतर व्यवस्थासंबंधी आढावा यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे घेतला.
****

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    वृत्त क्रमांक 642                                                                                                                                                              
                विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 कार्यक्रम जाहिर
उस्मानाबाद,दि.21 (जिमाका) :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये घोषित केला आहे.त्यानुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक घेतली जाणार आहे. सदरचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेअसणार आहे

अ.क्र.
                       निवडणूक कार्यक्रम
               नियोजित तारखा
1.
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
दि.27 सप्टेंबर 2019 (शुक्रवार),
2.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक
दि.4 ऑक्टोबर 2019 (शुक्रवार)
3.
नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक
दि.5 ऑक्टोबर 2019 (शनिवार)
4.
उमेदवारी अर्ज मार्ग घेण्याचा अंतिम दिनांक
दि.7 ऑक्टोबर 2019 (सोमवार )
5.
मतदानाचा दिनांक
दि.21 ऑक्टोबर 2019 (सोमवार
6.
मतमोजणीचा दिनांक
दि.24 ऑक्टोबर 2019 (गुरुवार )
7.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक
दि.27 ऑक्टोबर 2019 (रविवार )

या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रस्तुत प्रसिध्दीपत्रकाच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                         ****




Friday, 20 September 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

वृत्त क्रमांक 637                                                         दि.20 सप्टेंबर 2019

स्वयंरोजगार अंतर्गत पाच माजी सैनिकांना अनुदानाचे वितरण

उस्मानाबाद,दि.20(जिमाका): माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावर मंजूर आर्थिक अनुदानाचे वाटप उस्मानाबाद जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे माजी सैनिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या हस्ते झाले. दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. यावेळी माजी सैनिक शिंदे विष्णू अण्णाराव यांना रु. 2,35,000/- तर माजी सैनिक कुमार भानुदास मोरे यांना रु. 2,47,082/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.
 तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात माजी सैनिकांना स्वयंरोजगार योजनेतंर्गत दि.14 फेब्रुवारी 2018 पूर्वी ट्रॅक्टर खरेदी/कुक्कुटपालनासाठी घेतलेल्या कर्जावर मंजुर आर्थिक अनुदानाचे माजी सैनिकांना वितरण करण्यात आले आहे. यामध्ये माजी सैनिक सुरवसे शिवाजी गहिनीनाथ यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,95,180/- माजी सैनिक सावंत त्रिंबक महादेव यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी रु. 1,75,065/- तर माजी सैनिक जाधव तानाजी शिवाजी यांना कुक्कुटपालनासाठी रु. 2,50,000/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये स्वयंरोजगार अंतर्गत जिल्ह्यातील पाच माजी सैनिकांना एकूण रक्कम वाटप करण्यात आले आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस.फिरासत यांनी कळवले आहे.
                                   ****
वृत्त क्रमांक 638

हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादारांना नोंदणी करण्याचे आवाहन

उस्मानाबाद,दि.20(जिमाका ): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हरितगृह/शेडनेट गृह उभारणी सेवा पुरवठादाराची जिल्हास्तरीय नोंदणी करण्यात येणार आहेत. हरितगृह/शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या इच्छूक सेवा पुरवठादारांना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपली नोंदणी अर्ज दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात (प्रपत्र 12) मध्ये सादर करावेत. अर्जांचा नमुना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दि.30 सप्टेंबर 2019 रोजी नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अटी व शर्ती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2018 -19 चा मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लागू राहतील. आर्थिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी उस्मानाबाद   यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
****

Attachments area

Thursday, 19 September 2019

बालविवाह रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी - डॉ. संजय कोलते

वृत्त क्र.636                                                                                                                          दि.18 सप्टेंबर 2019
बालविवाह रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी
                                                   - डॉ. संजय कोलते
        उस्मानाबाद,दि.18 (जिमाका): मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची क्षमता सिध्द करावी. बालविवाह होणे अतिशय दुर्दैवी प्रथा असून  बालविवाह रोखणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विशेषत: ग्रामीण भागात याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. मुली उच्चशिक्षित व्हाव्यात, समाजात बालविवाहाला थारा देऊ नये , मुलींचा जन्माचा दर वाढला पाहिजे, असे विचार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आज येथे व्यक्त केले.
उमरगा शहरात बुधवारी ( ता.18) रोजी बालविवाह एक अभि:शाप या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व चित्रपटातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार  या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम थिएटर येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे अध्यक्षस्थानी होते तर पंचायत समितीचे सभापती अॅड.राजासाहेब पाटील,नगराध्यक्षा  प्रेमलता टोपगे, उपविभागीय पोलिस अधिकारी  अनुराधा उदमले,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत,  तहसिलदार संजय पवार,  उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड,अंनिसचे जिल्हा राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. दिलीप सगर, अॅड. प्रदीप पणुरे, अॅड. प्रवीण तोतला, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, महिला बालविकास अधिकारी सुरेखा जाधव, उद्योजिका ज्योती सपाटे आदींची उपस्थिती होती. 
उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी समाजातील अनिष्ठ रुढीला बाजूला सारून मुलींनी स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज असल्याचे सांगितले.




पंचायत समितीचे सभापती राजेसाहेब पाटील,किरण सगर, सचिन बिद्री, किशोरी साठे आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी उपस्थित महिला व मुली तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचे सामूहिक वाचन केले. श्री.छत्रपती महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.जाधव आणि आदर्श महाविद्यालय, उमरगा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप गरूड यांनी लोकराज्य महाविद्यालय म्हणून प्रस्ताव जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनुर्विदयेत राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारी कु.आर्या सुरेंद्रवाले आणि भारूड लोककलेव्दारे राज्य व देशपातळीवर उस्मानाबाद जिल्हयाचे नाव उज्वल करणारी  कु.कृष्णाई उळेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.याप्रसंगी मोबाईलच्या माध्यमातून कृष्णाई उळेकर हिने बालविवाह प्रतिबंध या विषयावरील सुंदरसे भारुड सादर करून उपस्थित महिला व मुलींचे प्रबोधन केले. कृष्णाईच्या वतीने तिचे वडील श्री.प्रभाकर उळेकर या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी प्रास्ताविक केले.
अमोल पाटील, संजय कोथळीकर, प्रा. युसुफ मुल्ला, प्रभाकर मजगे, विजय जाधव, शैलेश महामुनी, पद्माकर मोरे, प्रा. विनोद देवरकर, रविंद्र पोतदार, स्वाती मायाचारी, कैलास आष्टे, सारंग देवा, इमाद सय्यद आदींनी यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण स्वामी, पुष्पलता पांढरे यांनी केले. श्री. सचिन बिद्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास उमरगा शहरातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षिका,अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.
*****