Sunday, 23 September 2018

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


महिला विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिला समाज सेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रदान करण्यात येतात.
राज्यस्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रातकिमान 25 वर्षे उललेखनीय कार्य करणाऱ्या  समाज सेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रू. 1 लाख रोख, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‍विभागीय स्तर पुरस्कार:- महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे ‍ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना रू.25001/- , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ पुरस्कार दिला जातो.
जिल्हास्तरीय पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रात 10 वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला समाजसेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराप्रित्यर्थ रू. 10,001/- रोख , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देण्यात येतो.
          वरीलप्रमाणे सन 2015-16, 2016-17 व सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र महिला समाजसेविका व स्वयंसेवी  संस्था यांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह तीन प्रतीत दि.25/9/2018 पर्यंत प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. तसेच‍ अर्टी शर्ती व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, खोली क्रं. 10 तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

बेळगांव येथे युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा


उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात  येते की, मराठा लाईट इन्फंट्री रेजीमेंटल सेंटर, बेळगांव (कर्नाटक) येथे दि.24 सप्टेंबर 2018 पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर भरती सोल्जर जी.डी. सोल्जर (क्लर्क जीडी) व सोल्जर ट्रेडसमन या पदासाठी होणार आहे.
तरी उस्मानाबाद जिल्हयातील आजी सैनिक /माजी सैनिक/ विधवांच्या इच्छुक पाल्यांनी / भावांनी  दि. 24 सप्टेंबर 2018 रोजी शिवाजी स्टेडियम, मराठा  लाईट इन्फन्ट्री रेजीमेंटल सेंटर येथे सोबत रिलेशन प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी व डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, अविवाहीत दाखला, चारित्र्याचा दाखला,  खेळाचे/ NCC चे प्रमाणपत्र असल्यास, आधारकार्ड, पॅनकार्ड, 15 रंगीत  फोटो, 18 वर्षापेक्षा कमी वय असल्यास वडिलांचे संमतीपत्र, नावात बदल असल्यास 10 रू.चे स्टॅम्प पेपरवर  शपथपत्र, वडील व भाऊ यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, दोन वर्षातील खेळाडूंचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे फोटो, नाव व नात्यासहित व इतर सर्व कागदपत्रे सोबत घेवून भरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  उस्मानाबाद यांनी केले आहे.
                                                          ***


फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू


               सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सव, अगामी नवरात्र महोत्सव व दिपावली सण या काळात दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी आणि कायदा  व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.  

हे आदेश दिनांक 20 सप्टेबर  2018 चे 00.05 वाजले पासून ते दिनांक  03 नोव्हेंबर  2018 च्या 24.00 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीला किरायाने/ भाडयाने ठेवतांना घर मालक, लॉज चालक संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालक यांनी वास्तव्यास राहणा-या व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबत माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला न देता भाडयाने/ किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
 तसेच उस्मानाबाद जिल्हयात कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुय्यमप्रती मोटार वाहनांच्या तसेच जूने वाहन भंगार मध्ये खरेदी- विक्रीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला
माहिती न देता खरेदी- विक्री करण्यास मनाई करण्यास आले आहे. आक्षेपार्ह सिडी/ गाणे वाजविल्यामुळे जातीय-धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हयात कोणत्याही कार्यक्रमात अथवा कोणत्याही ठिकाणी आक्षेपार्ह सिडी/ गाणी/ संगीत वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे.  तसेच मागील एक महिन्यात विक्री केलेल्या सिमकार्ड धारकांची माहिती साद करणे बंधनकारक राहील. सायबर कॅफी मालकास आपली ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वरील कालावधीत शोभेची दारु विनापरवाना साठा तसेच ड्रोनचा विना परवाना वापर करण्यास मनाई येत असल्याचे  अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.