Monday, 10 April 2017

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.


उस्मानाबाद.दि.10:- जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू,  करिता शासनातर्फे जिल्हा  क्रीडा पुरस्कार दिला जातो. यावर्षी जिल्हयातुन सन 2015-16 गुणवंत खेळाडू (1 महिला , 1 पुरुष ) यासाठी यापुर्वी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते परंतु गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला )या गटात प्रस्ताव कमी आलेले आहेत.  तेव्हा उस्मानाबाद जिल्हयातील पुरुष गटातील खेळाडू कडून पुन्हा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी संबंधित खेळाडूंनी यांची नोंद घेवून परिपुर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे तसेच यापुर्वी ज्या खेळाडूनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांना पुन्हा प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता नाही.

तरी संबंधित खेळाडूंनी अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,  श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 एप्रिल 2017 पर्यत सदर कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी केले आहे.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे रहावे-पालकमंत्री दिवाकर रावते




            
उस्मानाबाद.दि.10:-प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केल्या.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री.रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री.खोत, तहसिलदार सुजित नरहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे कमतरता भासणार नाही यासाठी काळजी घ्यावी तसेच खरीप पूर्व हंगाम शेती मशागतीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळावे घेवून शेतकऱ्यांना दिलासा दयावा.
          शेतकऱ्यांना सावकारी कायदयाबाबत माहिती व्हावी यासाठी गावात दवंडी देवून जास्तीत जास्त  जनजागृती करावी, शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्ररित्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सुलभतेने पिक कर्ज उपलब्ध होईल. असे ही श्री.रावते  म्हणाले.

           या आढावा बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी श्री.जमदाडे यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे प्रस्ताविक केले तर आभार जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.खोत यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

Sunday, 9 April 2017

राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे संपन्न


उस्म्नाबाद,दि.9:-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.8 एप्रिल रोजी 2017 जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 10.30 वाजता पक्षकार,संपादन मंडळ अधिकारी,विधीज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्लनाने  लोक अदालतीचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी  प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  श्री. आर . आर. देशमुख, प्राधिकरणाचे  सचिव श्री. एस. आर. पडवळ, सर्व  न्यायीक अधिकारी,उपभिागीय अधिकारी श्री. आयुष प्रसाद, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश भोसले,जिल्हा  सहाय्यक सरकारी विधीज्ञ श्री जयंत देशमुख, भूसंपादन अधिकारी,शासकीय अधिकारी,विमा कंपनी अधिकारी, बॅक अधिकारी, पक्षकार त्यांचे विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राधिकरणाचे सचिव श्री. एस.आर पडवळ यांनी पॅलननिहाय ठेवण्यात आलेल्या  प्रकरणांची  रूपरेषा  सांगितली.
जिल्हयातून मोठ्या संख्येने प्रलंबित प्रकरणे  तसेच दावापूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती पैकी दिवाणी स्वरूपाची 449,मोटार अपघात /कामगार नुकसान भरपाई प्रकरणे 16,भूसंपादन प्रकरणे 104,फौजदारी स्वरूपाची 164,तडजोडपात्र प्रकरणे,वैवाहिक सबंधी 11 ,धनादेशाची 62 प्रकरणे,विविध बॅकेची 20 दावापूर्व 20 प्रकरणे सामोपचाराणे मिटविण्यात आली.मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील  पक्षकारांना रूपये 28 लाख 59 हजार 994 वसूली करून देण्यात आली. भूसंपादन प्रकरणामध्ये रूपये 11 कोटी 20 लाख 80 हजार 804 मावेजा मंजूर होवून रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली तसेच काही वसूलीच्या दरखास्तीमध्ये 52 लाख 53 हजार 332 रक्कमेची वसूली  मिटविण्यात आली. याच लोकअदालतीमध्ये 20 दावापूर्व प्रकरणांमध्ये रूपये 1 लाख्‍ 5 हजार 100 रकक्मेची तडजोड झाली.
 लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायिक अधिकारी सर्वश्री एस. आय.पठाण,श्री आर.एन.रोकडे, श्री.एस. आर. पडवळ, श्रीमती रचना तेहरा, एस.बी. देसाई,आर. के.राजेभोसले, श्रीमती एन.पी. पवार एस.ए.जमादार, ए.सी.पारशेट्टी, श्रीमती ए.एस. बिराजदार, श्री.ए.ए.बाबर तसेच इतर पंच म्हणून विधिज्ञ  सदस्यांनी  काम  पाहिले.