उस्मानाबाद.दि.10:- जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व
प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, करिता
शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला
जातो. यावर्षी
जिल्हयातुन सन 2015-16 गुणवंत खेळाडू (1 महिला , 1 पुरुष ) यासाठी यापुर्वी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते परंतु
गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला )या गटात प्रस्ताव कमी आलेले आहेत.
तेव्हा उस्मानाबाद जिल्हयातील पुरुष गटातील खेळाडू कडून पुन्हा जिल्हा
क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी संबंधित खेळाडूंनी यांची
नोंद घेवून परिपुर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे तसेच
यापुर्वी ज्या खेळाडूनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांना पुन्हा प्रस्ताव दाखल
करण्याची आवश्यकता नाही.
तरी संबंधित खेळाडूंनी अधिक
माहितीसाठी www.maharashtra.gov.in किंवा जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज
दिनांक 20 एप्रिल 2017 पर्यत सदर कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी केले आहे.