समारोप
कार्यक्रमास सांस्कृतिक मंत्री तावडे यांची उपस्थिती
स्वागताध्यक्ष
आमदार सुजितसिंह ठाकूर यांची माहिती
उस्मानाबाद,
दि. ९- उस्मानाबाद येथे येत्या २१ एप्रिलपासून सुरू होणार्या अखिल भारतीय मराठी
नाट्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
होणार आहे. तर नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमास शिक्षण व सांस्कृतिकमंत्री
विनोद तावडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर
पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनाही नाट्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले
असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
अखिल भारतीय
मराठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ९७ व्या
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते होणार आहे. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता नाट्यदिंडीस प्रारंभ होईल.
नाट्यदिंडीचे आगमन तुळजाभवानी क्रीडा संकुलातील मुख्य रंगमंचावर झाल्यानंतर
सायंकाळी ६ वाजता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनाने नाट्य संमेलनास प्रारंभ होणार
आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री
तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ.
दीपक सावंत, सहपालकमंत्री तथा दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट
घेवून स्वागताध्यक्ष ठाकूर आणि नाट्य परिषदेचे प्रमुख कायर्र्वाह दीपक करंजीकर
यांनी रितसर निमंत्रण दिले आहे.
नाट्यसंमेलनापूर्वी
व्यावसायिक नाट्यमहोत्सवाने उस्मानाबाद शहरात विविध कार्यक्रमांची मेजवानी
रसिकश्रोत्यांना मिळणार आहे. २१ एप्रिल रोजी मुख्य संमेलनास प्रारंभ होवून २३
एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता खुल्या अधिवेशनाने नाट्यसंमेलनाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे
यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर विविध पक्षांतील सन्माननीय
लोकप्रतिनिधींनाही संमेलनातील उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात
आले आहे. सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि
संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावणनगरीत होऊ घातलेल्या नाट्य संमेलनाचा हा उत्सव
ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
