उस्मानाबाद.दि.10:-माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय व नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल 2017
रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला हॉलमध्ये "महाराष्ट्र
माझा" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार सुजितसिंह
ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
या
छायाचित्र प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष
प्रसाद यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय
छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे उस्मानाबाद
जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावीत या उदेशाने येथील मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत तळमजला हॉलमध्ये दि.11 ते 13 एप्रिल 2017 पर्यंत सकाळी 10ते
सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार आहे.
या
आयोजित "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ जिल्हयातील सर्व
नागरिकांनी तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, शालेय विदयार्थ्यांनी घ्यावा, असे
आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.