उस्मानाबाद.दि.6:-
कृषी विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद या कार्यालयाचे सन 2015-16 या आर्थिक वर्षाचा
लेखा परिक्षण अहवाल स्थानिक निधी लेखा उस्मानाबाद या कार्यालयाकडून
प्राप्त झाला आहे. लेखा परीक्षण आहवाल तसेच मागील सर्व वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल
कृषी विभाग जिल्हा परिषद, उस्मानाबाद या कार्यालयात सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता
कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी
खुला करण्यात आला आहे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. खोत यांनी केले.
Monday, 6 February 2017
हत्तीरोग दुरीकरणासाठी एकदिवसीय औषधोपचार मोहीम
उस्मानागाद.दि.6:- हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन
करण्यासाठी दि.10 ते 14 फेब्रुवारी या
कालावधीत जिल्हयातील संपूर्ण गावांमध्ये
एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
या
औषधोपचार मोहिमेंतर्गत जिल्हयातील सर्व गावांमध्ये दि.10 ते 14 फेब्रूवारी या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात हत्तीरोग प्रतिबंधक डी. ई. सी. व अल्बेडझॅल गोळया खाऊ घालण्याकरीता घरोघरी आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक येणार आहेत.
तरी त्यांच्या समक्षच दोन वर्षाखालील बालके,
गरोदर माता व गंभीर अजारी रुग्ण वगळून सर्वानी डी. ई. सी. व अल्बेडझॅल गोळयाचे सेवन करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी केले
आहे.
Sunday, 5 February 2017
"न्याय सेवा सदन"चे न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न्
उस्मानाबाद,दि.5:- जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण वैकल्पिक वाद निवारण केंद्र या नूतन इमारतीचे उदघाटन मा. न्यायमूर्ती,
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, औरंगाबाद श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्ते फीत
कापून या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे प्र. सदस्य सचिव श्री. एस.
आर. पडवळ, , अध्यक्ष, विधीज्ञ मंडळ श्री.
अजित खोत, जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील श्री. जाधवर,जिल्हा
पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, उपजिल्हाधिकारी
शिल्पा करमरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. थोरात व श्री. लांडगे,उपकार्यकारी
अभियंता तसेच कान्ट्रॅक्टर श्री. नाईकवाडी, जिल्ह्यातील सरकारी अभियोक्ता, सर्व विधीज्ञ, पत्रकार,न्यायालयीन कर्मचारी वृंद व नागरिक हे
उपस्थित होते.
या
उदघाटन प्रसंगी बोलताना मा. न्यायमूर्ती. श्री. व्ही. के. जाधव यांनी मध्यस्तांची
भुमिका विशद केली व त्यामुळे न्यायालयावरती होणारा वाढत्या कामकाजांचा व खटल्यांचा
भार कमी होईल व त्यामध्ये विधीज्ञांची भूमिका महत्वाची असून त्यांचे सहकार्य
महत्वाचे आहे असे सांगीतले. तसेच त्यांनी आजच्या समाजामध्ये तरुण जोडप्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले
आहे व त्यामुळे समाजामध्ये त्याचा विपरित
परिणाम होत असून, वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत त्यांच्यामध्ये समेट घडवून विवाह संस्था
मजबूत होण्यास मदत होईल.
प्रमुख
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख यांनी वैकल्पिक वाद निवारणाबाबतचे
महत्व सांगून पक्षकारांना त्याचा मोठा लाभ होवून त्यांचा वेळ, श्रम, पैसा यांची बचत
होईल असे सांगितले.
याप्रसंगी
विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ए. व्ही. खोत
यांनी विधिज्ञांतर्फे लोकन्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त खटले कमी करण्याबाबत
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या
कार्यक्रमाचे आभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे प्र. सदस्य सचिव श्री. एस. आर. पडवळ मानले.
Subscribe to:
Posts (Atom)
