उस्मानाबाद,दि.26:-जिल्हा
कोषागार कार्यालयाच्या वतीने मंगळवार
दि.27 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद
उस्मानाबाद येथे डिजिटल पेमेंट या विषयावर कार्यशाळा होणार आहे. विषयाची निकड
पाहता या प्रशिक्षणास अनिवार्य असल्यामुळे प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विशाल
पवार यांनी केले आहे.
Monday, 26 December 2016
कायाकल्प उपक्रम: आसू आरोग्य केंद्रास प्रथम पुरस्कार
उस्मानाबाद,दि.26:- कायाकल्प उपक्रमांतर्गत परंडा
तालुक्यातील आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
पटकाविला आहे. 'एसएमओ' डॉ.गायकवाड यांच्या
हस्ते हा पुरस्कार आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी वाळके यांना
प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.23 डिसेंबर
रोजी हा कार्यक्रम झाला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, डॉ. मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती
होती. आरोग्य सेवेअंतर्गत गुणवत्ता वर्धनासाठी राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये
कायाकल्प हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची अंमलबजावणी करणे प्रत्येक
आरोग्य केंद्रासाठी बंधनकारक करण्यात आले होते. ज्या आरोग्य केंद्राकडून हा उपक्रम
सक्षमपणे राबविला जातो, त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या माध्यमातून
रुग्णालयीन स्वच्छता, नियमित आरोग्य सेवा, आरोग्यविषयक विविध उपक्रम, रुग्णांना
सौजन्याची वागणूक देण्याच्या सूचना देण्यात आल्य होत्या.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात जिल्हाभरातील सर्व आरोग्य केंद्राची राज्य
तसेच जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. तपासणीअंती परंडा
तालुक्यातील आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हयातून अव्वल ठरले आहे. या
केंद्रास दि.23 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी वाळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास परंडयाचे तालुका
आरोग्य अधिकारी डॉ. अबरार पठाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाळके यांच्यासह आरोग्य
विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते पाडोळी येथील तूर केंद्राचे उद्घाटन
उस्मानाबाद,दि.26:- पाडोळी
येथील जयलक्ष्मी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्यामार्फत तूर व हरभरा केंद्राचे
उद्घघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, तहसिलदार सुजित नरहरे, कृषी उपसंचालक
डी. व्ही. जाधवर,तालुका कृषी अधिकारी एन.जी. देशमुख, डॉ. कुलकर्णी तसेच कंपनी
चे इतर संचालक
व सदस्य उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले
की, शेतकऱ्यांनी कृषी गटाच्या
माध्यमातून काम केले पाहिजे
त्यामुळे विकास निश्चित होईल
त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्वांनी एकत्र
येवून काम केले तर गावाचा विकास होवून
एक आदर्श गाव
निर्माण होईल.
जयलक्ष्मी फार्मर्स या कंपनीची 2013 मध्ये
स्थापना झाली त्यावेळी सुरूवातीस एकूण 250 सभासद होते. त्यामध्ये वाढ होवून आज 1
हजार 50 सभासद आहेत. पाडोळी, टाकळी, कनगरा, धुत्ता हे कंपनी कार्यक्षेत्रातील गावे
असून आत्माअंतर्गत नोंदणी असणारे 47 शेतकरी गट कंपनीचे सहासद आहेत. कंपनीची स्वत:ची
जमीन,गोडाऊन व सर्व यंत्रणा कार्यरत आहे. कंपनीतर्फे डेअरी चालविली जात असून
शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात, त्याचबरोबर
कंपनीकडून शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप केले जाते. कंपनीचे सभासद शेतकरी पॉलीहॉऊस
मधील जरबेरा फुलांचे उत्पादन देखील घेतात. जलयुक्त शिवार अभियानात 1 लाख रुपये
लोकवाटा भरून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामात सहभाग नोंदवला. कंपनी शासकीय हमी
भावाप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांचा
माल खरेदी करते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सतीष
देडे यांनी केले तर आभार श्री.अमर गुंड यांनी मानले.
Subscribe to:
Posts (Atom)