Thursday, 27 October 2016

निवडणूक कालावधीत मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून निवडणूक निरीक्षकांची नेमणूक

नगरपरिषद  सार्वत्रिक  निवडणूक-2016

उस्मानाबाद, दि.27:-राज्य निवडणूक आयोग  यांनी  उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद , तुळजापूर, नळदूर्ग, उमरगा,मुरुम, कळंब, भूम व परंडा या आठ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक  निवडणूका आणि  नगरपरिषद  अध्यक्ष पदासाठी  निवडणूक कार्यक्रम घोषित केला  आहे .

या  निवडणूक  कालावधीत सामान्य  नागरिकांची , मतदारांची गैरसोय  होऊ नये म्हणून मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक  निरीक्षकांची नेमणूक  करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक  म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री. आनंद एकनाथराव रायते (मो. 8879967788),   उमरगा , नळदूर्ग आणि मुरुम  नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी श्री.ए.पी. पाठक (मो.9422242323, 9420218500),  कळंब, भूम आणि परंडा नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक  म्हणून  जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री.ए.एस.शेंगुलवार (मो.9689271381) आणि उस्मानाबाद  व तुळजापूर नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक म्हणून  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती आर .एस. सातपुते (मो.9423294010) यांची नेमणूक  करण्यात आली आहे .

निवडणूक  संदर्भात  निर्माण होणाऱ्या  अडचणींबाबत नागरीकांनी आणि मतदारांनी   वरील मुख्य निवडणूक निरीक्षक आणि  निवडणूक निरीक्षक यांच्याशी  संपर्क साधावा , असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी केले आहे .

Wednesday, 26 October 2016

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात शस्त्र व जमावबंदी

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2016

उस्मानाबाद,दि.26:-जिल्ह्यात 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहिल.

आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत.

तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 26 ऑक्टोबर  पासून   4 नोंव्हेबर, 2016 रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.       
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
जिल्हयात कलम 144 लागू
उस्मानाबाद:-राज्य निवडणूक  आयोगाने दि. 17 ऑक्टोबर 2016 रोजी  नगरपरिषद/ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणूका  आणि  नगरपरिषद अध्यक्षांचा निवडणूक  कार्यक्रम घोषित  केला आहे.या कालावधीत  आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने  तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अप्पर जिल्हाधिकारी  यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता  1973 चे कलम 144 अन्वये  दि. 26 ते 28 नोव्हेंबर 2016 रोजीपर्यंत  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात  निवडणूक आचारसंहिता  संपेपर्यंत, मतदान केंद्राच्या परिसरात  मतदाना दिवशी  तसेच मत मोजणी केंद्रापासून  100 मीटर च्या परिसरात  बंदी आदेश  लागू करण्यात आले आहेत .


हे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दि. 24 ऑक्टोबर 2016 ते निवडणूक  आचारसंहिता संपेपर्यंत  अंमलात राहतील, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे .

Tuesday, 25 October 2016

नगर परिषद निवडणूक-2016 सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 212 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ नगर परिषदांसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार असून दिनांक 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणूका निर्भयपणे व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नगर परिषद निवडणूक-2016 च्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे,  जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, नगर पालिका प्रशासन अधिकारी राजीव बुबणे, सहायक आयुक्त विक्रीकर विभाग श्री. मामीले, या सनियंत्रण समिती सदस्यांची उपस्थिती होती.
नगर परिषदांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आली असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी. उस्मानाबाद जिल्हयात होणार असलेल्या आठ नगर परिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही आदर्श आचासंहितेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच निवडणूक कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगून निवडणूक होणाऱ्या नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
तसेच मुख्य कार्यकारी  अधिकारी आनंद रायते , अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, निवडणूक सनियंत्रण समिती, व्हिडीयोग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट, तक्रार निवारण कक्ष, मतदार जनजागृती, निवडणूक काळात काय करावे काय करु नये, मालमत्तेचे विद्रुपीकरण विरोधी कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक काळात परवानाधकांची शस्त्रे जमा करणे,पेड न्यूज याबाबत सविस्तर माहिती दिली.

या बैठकीस नगर परिषद निवडणूक सनियंत्रण समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.