नगरपरिषद सार्वत्रिक
निवडणूक-2016
उस्मानाबाद, दि.27:-राज्य निवडणूक आयोग
यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद
, तुळजापूर, नळदूर्ग, उमरगा,मुरुम, कळंब, भूम व परंडा या आठ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि
नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे .
या निवडणूक कालावधीत सामान्य नागरिकांची , मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य निवडणूक निरीक्षक व
निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. आनंद एकनाथराव
रायते (मो. 8879967788), उमरगा , नळदूर्ग आणि मुरुम नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी
श्री.ए.पी. पाठक (मो.9422242323, 9420218500),
कळंब, भूम आणि परंडा नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा
परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ए.एस.शेंगुलवार
(मो.9689271381) आणि उस्मानाबाद व
तुळजापूर नगरपरिषदेचे निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प
संचालिका श्रीमती आर .एस. सातपुते (मो.9423294010) यांची नेमणूक करण्यात आली आहे .