नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणूक-2016
उस्मानाबाद,दि.26:-जिल्ह्यात 26 ऑक्टोबर
ते 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर
जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या
आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू
बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहिल.
आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता
येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे,
घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या
भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत.
तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र
येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा
भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 26 ऑक्टोबर पासून 4 नोंव्हेबर, 2016 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
जिल्हयात कलम 144 लागू
उस्मानाबाद:-राज्य निवडणूक आयोगाने दि. 17 ऑक्टोबर 2016 रोजी नगरपरिषद/ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका
आणि नगरपरिषद अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अप्पर
जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि. 26 ते 28 नोव्हेंबर 2016 रोजीपर्यंत
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय
परिसरात निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत, मतदान केंद्राच्या परिसरात मतदाना दिवशी
तसेच मत मोजणी केंद्रापासून 100
मीटर च्या परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत .
हे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दि. 24 ऑक्टोबर 2016
ते निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत अंमलात राहतील, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी
कळविले आहे .