मुंबई, दि. 27 : मांगल्य आणि प्रकाशाचा सण असलेला दीपोत्सव नागरिकांनी पारंपरिक उत्साहात तसेच पर्यावरणपूरक आणि सुरक्षिततेच्या जाणिवेने साजरा करावा, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, दिव्यांचा सण असलेल्या उत्सवाच्या या पावनपर्वात मनातील सौहार्दाचे दीपही उजळावेत. यंदा समाधानकारक पावसामुळे राज्यावरील दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासपर्वात मोठा लोकसहभाग लाभल्याने राज्याची प्रगतीकडे गतिमान वाटचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने हा उत्सव आनंदाने साजरा करावा.