नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणूक 2016
उस्मानाबाद:-
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 सुरळीत पार
पाडण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत
नारनवरे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
घेतली . या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाटगे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.
नारनवरे यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ही निवडणूक सुरळीत व अनुचित प्रकाराशिवाय पार
पडावी याबाबत सूचना दिल्या. पोलीस प्रशासनाने मतदान केंद्राच्या 100 मीटर
परिसरात बॅरेकेटींग लावणे, जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवणे, पेट्रोलिंग व झोनल प्लॅन तयार करणे,
आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास
तात्काळ कारवाई करणे , उत्पादन
शुल्क विभागाने अवैध दारु विक्रीवर विशेष
लक्ष देणे, तसेच नव्याने नियुक्त करण्यात
आलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणुक
निर्णय अधिकारी , अतिरिक्त निवडणूक अधिकारी यांनी तक्रार निवारण केंद्र ,
सुविधा कक्ष स्थापित करणे , निवडणुकीविषयीच्या सर्व बातम्या डॅशबोर्डवर उपलोड करणे
आदि सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या. तसेच सर्व संबंधितांनी
संबंधित सूचनांची कोटकोरपणे अंमलबजावणी
करण्याबाबत सूचित केले.
याशिवाय सर्व निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक
निर्णय अधिकारी , अतिरिक्त निवडणूक अधिकारी यांनी त्या-त्या प्रभागांना भेटी देऊन निवडणूक कामकाजासंदर्भातील विविध आवश्यक बाबींचे सुक्ष्म निरीक्षण करुन त्यात आवश्यता भासल्यास सुधारणा कराव्यात , नगरपालिका प्रभागात मतदार जागृती
अभियान मोठ्या प्रमाणात राबवावे, निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आवश्यक ती पथके स्थापित
करावित , अशा विविध सुचनाही यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना दिल्या.
नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया ही यावेळेस
ऑनलाईन करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होऊ नये याची
काळजी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सूचित केले.
या बैठकीनंतर नवनियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक
निर्णय अधिकारी , अतिरिक्त निवडणूक अधिकारी
यांच्यासाठी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसंबंधित आचारसंहिता , निवडणूक कालावधीत
उमेदवारांकडून विविध मार्गांनी होणाऱ्या खर्चाची माहिती, पेड न्यूज इत्यादी विषयांबाबतचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते . या प्रशिक्षणामध्ये अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाठक यांनी उपस्थित
अधिकाऱ्यांना आचारसंहिता तसेच कोषागार अधिकारी श्री.पवार यांनी निवडणूक
खर्चासंबंधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. मुळे यांनी पेड न्यूज संदर्भातील मार्गदर्शक तत्वे याविषयांबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. प्रभोदय मुळे,
कोषागार अधिकारी विशाल पवार आणि सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ,सहायक
निवडणूक निर्णय अधिकारी , अतिरिक्त निवडणूक
अधिकारी आदि उपस्थित होते.