Wednesday, 18 October 2017

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट सहपालकमंत्री महादेव जानकर






उस्मानाबाद.दि.18:-  राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने सरकारने कर्जमाफीची भेट दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री  तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे सहपालकमंत्री  महादेव जानकर यांनी आज येथे केले . 
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर,‍जिल्हाधिकारी  राधाकृष्ण गमे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्‍हाधिकारी शिल्‍पा करमरकर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक श्री. जगदाळे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक श्री. विजयकर, तहसिलदार सुजित नरहरे, जिल्‍हाध्‍यक्ष दत्‍तात्रय कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अन्य पदाधिकारी तसेच विविध विभागांच्या विभागप्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाच्या महत्त्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत उस्‍मानाबाद जिल्ह्यातील पात्र लाभार्थी कुटुंबांपैकी उस्‍मानाबाद तालुक्‍यातील चनबस शिवय्या कपाळे, रा. बावी, भारत तात्‍या तांबे, रा. बावी, तुळजापूर तालुक्‍यातील नागनाथ गुंड, रा. सुरतगाव, चंद्रकांत शेनमारे, रा. पिंपळा बु., भिमा आंबुरे, रा. सुरतगाव, लोहारा तालुक्‍यातील तुकाराम साठे, रा. माकणी, शिवाजी करदूरे, रा. माकणी, रहेमान पठाण, रा. माकणी, कळंब तालुक्‍यातील शरद सावंत, रा. सौंदाणा ढोकी, नारायण कुलकर्णी, रा. सातेफळ, शिवहरी शेळके, रा. भोसा, वाशी तालुक्‍यातील गोरोबा तावरे, रा. जिन्‍नर, राजेंद्र शिंदे, रा. बावी, प्रताप घुले, रा. वाशी, भूम तालुक्‍यातील दत्‍तात्रय चव्‍हाण, रा. वालवड, परंडा तालुक्‍यातील भास्‍कर तनपुरे, रा. खासापुरी, विक्रम देशमुख रा. खासापुरी, सुरेश बारसकर रा. अंदोरी अशा एकूण 23  लाभार्थ्‍यांना प्रातिनिधिक स्‍वरुपात शाल,श्रीफळ, टोपी,  साडी-चोळी व प्रमाणपत्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्स्यव्यवसायमंत्री  तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे सहपालकमंत्री महादेव जानकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्‍हाधिकारी राधाकृष्‍ण गमे यांच्या हस्ते वाटप करण्‍यात आले.  
यावेळी सहपालकमंत्री श्री. महादेव जानकर म्हणाले की, शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. दिड लाखापर्यंतचे कर्ज माफी झाल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. जानकर यांनी सांगितले. 
पुढे पालकमंत्री श्री. महादेव जानकर म्हणाले की,उस्‍मानाबाद जिल्ह्यातील एकूण 1लाख 39 हजार 577 शेतकर्‍यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले असून पात्र सर्व शेतकर्‍यांना ऑक्‍टोबर अखेरपर्यंत कर्जमुक्‍ती देण्‍यात येणार आहे. तसेच उस्‍मानाबाद जिल्‍हयातील जलयुक्‍त शिवारच्‍या कामामुळे भूगर्भातील पाण्‍याच्‍या पातळीत वाढ झाली असल्‍याने त्‍यांनी जिल्‍हाधिकारी राधाकृष्‍ण गमे यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उपनिबंधक श्री. जगदाळे यांनी केली तर आभार अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक श्री. विजयकर यांनी मानले. यावेळी शेतकर्‍यांची उपस्थिती मोठया संख्‍येने होती.   

Friday, 13 October 2017

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याबाबत आवाहन


उस्मानाबाद, दि.13:- जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व खाजगी आस्थापनांनी माहे 30 सप्टेंबर 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 दि.31ऑक्टोबर 2017 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे http://www.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आपला युजर आयडी व पासवउर् वापरुन भरावे, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहाय्यक संचालक बालाजी मरे यांनी केले आहे.
          केंद्र शासनाने सेवायोजना कार्यालये (सक्तीने पदे अधिसुचित करण्यास भाग पाडणे) कायदा 1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 पारीत केला असून या कायदयाच्या कलम -5 अन्वये सर्व संबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस ऑनलाईन भरुन या कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.कायदयातील नियम-6 च्या पोटनियम 3 मध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेकी, तिमाही विहितप्रपत्र ई-आर-1 च्या प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर व 31 डिसेंबर या विहित तारखा असतील व विहित प्रपत्र या विहित तारखेपासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण



उस्मानाबाद, दि.13:- आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती.वृषाली तेलोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.