जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
उस्मानाबाद, दि.13:- आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती.वृषाली तेलोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर
आडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.