Friday, 13 October 2017

स्पर्धा परिक्षा विशेष उपक्रमासह ग्रंथालयाच्या जागेचाही प्रश्न मार्गी लावणार-जिल्हाधिकारी श्री.गमे



उस्मानाबाद, दि.13:- स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी चांगले वातावरण हवे, त्यासाठी मोकळी प्रशस्त चांगली जागा हवी, यासाठी ही सर्वांचीच जबाबदारी आहे.प्रशासनाचा प्रमुख म्हणून विशेष लक्ष घालून जिल्हा ग्रंथालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी श्री.गमे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार, प्रा.श्री.देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.गमे पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या युगात मोठया प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन विकास साधला पाहीजे. काळानुरुप आपण आपल्यात बदल घडवून आणला पाहीजे.नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्यांचा चांगल्यासाठी वापर करायला हवा, असे सांगितले.

यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी राहुल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी केले.