उस्मनाबाद,दि.16:- मराठवाडा मुक्ती संग्राम
दिनाच्या 69 वा वर्धापन दिन मराठवाडयातील
सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य
परिवहन विभागात व त्यांच्या कार्यक्षेत्रातील आगारात साजरा केला जाणार असून, या समारंभानिमित्त राज्याचे परिवहन, खारभूमी विकास
मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते "स्वच्छ भारत अभियानाचा"
शुभारंभ एस.टी.बसस्थानक, उस्मानाबाद येथे
करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.2
राज्य दपरिवहन मध्यवर्ती कार्यालय, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत, असे विभाग
नियंत्रक राज्य परिवहन उस्मानाबाद श्री.राजीव साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.Saturday, 16 September 2017
महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा -जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
उस्मानाबाद,दि.16:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न
मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांचे हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या
दृष्टीने महिलांच्या तक्रारी/ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी
व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून
लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.त्या अनुषंगाने सोमवार 18 सप्टेंबर 2017 रोजी
महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे, या महिला
लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी अशोक सावंत यांनी कळविले आहे.
दर
महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला
लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यादिवशी
सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणुन
पाळण्याबाबतचे निर्देश आहेत. यात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुण्यात नसणारे व
आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति न जोडलेला अर्ज, सेवा विषयक,आस्थापणा विषयक बाबी,
तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
तालुकास्तरावर
प्राप्त प्रकरणावर कार्यवाही होऊन तक्रारीचे निराकरण न झाल्यास अशी प्रकरणे जिल्हास्तर
महिला लोकशाही दिनामध्ये विचारार्थ घेतली जातात.
उस्मानाबाद
येथे दि. 18 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला
लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या लोकशाही
दिनात महिलांचे वैयक्तीक स्वरुपाचे तक्रार/निवेदन विहित नमुन्यात स्विकारले जाणार
आहेत. अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत गाळा नं. 10, तळमजला, उस्मानाबाद येथे
कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.बेरोजगार उमेदवारांकरिता 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन
उस्मानाबाद,दि.16:-
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित बारामती,
पुणे, लातुर येथील खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील
580 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, असमनाबाद येथे
शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी घेऊन
निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक
पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
पियागो
व्हेईकल प्रा.लि. बारामती येथे जॉब ट्रेनी 150 पुरुष, आयटीआय ट्रेड- फिटर, स्प्रे
पेंटर,वेल्डर, टर्नर, शिट मेटल, मशिनिष्ट, मोटार, डिझेल, पंप,मेकॅनिकल, 18 ते 28
वयोमर्यादा, ओसिस टेक्नॉलीज उस्मानाबाद अंतर्गत कॉम्प्युटर हार्डवेअर इंजि. 5
पुरूष, किमान बारावी पास, हार्डवेअर डिप्लोमा, 18 ते 50 वयोमर्यादा राहील,
कॉम्प्युटर ऑपरेटर 35 स्त्री-पुरुष, किमान बारावी पास आणि MS-CIT पास असावा, 18 ते
35 वयोमर्यादा राहिल, पुणे येथील एमपीटीए एज्युकेशन लि., पियागो वेहीकल प्रा.लि.,
भारत फोर्स लि., वारोक पालीमर्स लि., ट्रेनी
150 पुरुष, फिटर, वेल्डर,डिझेल, मोटार मेकॅनिक डिप्लोमा मेकॅनीकल, आयटीआय
कोणताही, किमान इ.12 वी पास, 18 ते 26 वयोमर्यादा, पुणे येथिलच अन्य कंपनीत जॉब
ट्रेनी 150 पद,(मुले-मुली) किमान 10 वी
/12 वी पास बीए, बी.कॉम, बीएसस्सी पदवी पास, आयटीआय कोणताही ट्रेड, एमबीए
मार्केटींग, प्रथम शिक्षण संस्था किल्लारी
जि.लातुर येथे मेसर 30 किमान पाचवी पास, वेल्डर 30 किमान 10 वी पास आयटीआय वेल्डर,
बार बेन्डीग किमान सातवी पास, आयटीआय वेल्डर, 18 ते 30 वयोमर्यादा राहील.
वेतन सुरुवातीस
किमान 7 हजार 500 ते 12 हजार पर्यंत पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील. सुविधा
कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या
नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व
मार्गदर्शन करतील, तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र,
शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ
फोटो आदी सर्व
कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपींसह
प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील
रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा.
या
मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर
रजिस्ट्रेशन (एम्पलॉयमेंट नोंदणी) असणे बंधनकारक आहे.नोंदणी नसल्यास उमेदवार
उमेदवार www.rojgar.mahaswayam.in या
संकेतस्थळावर नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात. संपर्कासाठी
कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02472-222236 वर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक
श्री. बालाजी मरे यांनी केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)