Friday, 9 June 2017

Digidhan Janjagruti Satkar FTP

महाराष्ट्र डिजीधन जनजागृती स्पर्धेतील विजेत्या संघाचा पारितोषक वितरण समारंभ संपन्न




उस्मानाबाद,दि.9:- "कॅशलेस व्यवहाराच्या विविध पध्दती, महाराष्ट्र डिजीधन जनजागृती आणि नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी सक्षम बनविणे" या आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघाचा पारितोषक समारंभ निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
या स्पर्धेतील पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर,स्वप्नील पुरी,योगेश अडकिते,एनएसएस च्या जिल्हा समन्वयक डॉ.शीला स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.यादव म्हणाले की,या कॅशलेस व्यवहार जनजागृती स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हयातील एकूण  15 महाविद्यालयातील 496 विद्यार्थी- विद्यार्थींनीनी सहभाग नोंदवून एक आदर्श निर्माण केला आहे.कॅशलेस व्यवहार सर्वांनीच करावा, असे आवाहन करुन कॅशलेस इकॉनॉमीचे महत्वही पटवून दिले.
महाराष्ट्र डिजिधन जनजागृती कार्यक्रमात प्रथम आलेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब,द्वितीय छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व तृतीय विशेष पारितोषिक रामकृष्ण परमहंस विद्यालय/महाविद्यालय,उस्मानाबाद यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.तसेच या स्पर्धेत उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र डिजिधन जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिक गायकवाड,नितीन जोशी कुमारी  ऋतुजा घोगरे,अंजली देशमुख आणि अंकिता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

Thursday, 8 June 2017

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टय तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री दिवाकर रावते

                   
                         
                                                                       
उस्मानाबाद,दि.8:- राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीककर्जाचे वाटप करून उदिष्ट तातडीने पूर्ण करावे,असे स्पष्ट निर्देश परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री.रावते यांचे अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पीककर्ज वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी  ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, कृषी विकास अधिकारी श्री.खोत, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे,अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.विजयकर आदीसह जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करावे यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी राष्ट्रीयकृत बँकेशी समन्वय साधून पीककर्ज वाटपाचे उदिष्ट साध्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटप व उदिष्टांबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी खरीप हंगाम पीककर्ज वाटप आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की, जिल्हयातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेने आपल्या बँकेत पीककर्जाबाबत फलक लावून, एक खिडकी योजना सुरु करुन कर्ज वाटप सुरु करावे व आपल्या बँकेने केलेल्या कामाचा अहवाल फोटोसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा,असे सूचित केले.