Thursday, 23 February 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 उस्मानबाद जिल्हयाचा निकाल जाहीर


       उस्मानाबाद, दि.23:- जिल्हा  परिषद  पंचायत  समिती  सार्वत्रिक  निवडणूक 2017 चा उस्मानाबाद  जिल्हयाचा  निकाल निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज जाहीर केला.
          उस्मानाबाद जिल्हा परिषदेकरिता एकूण 55 जागांकरिता विविध पक्षाच्या एकूण 257 उमेदवारांमध्ये चुरस होती. त्यापैकी उस्मानाबादच्या  जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या26,शिवसेना पक्षाच्या11, कॉग्रेस पक्षाच्या 13,भारतीय जनता पक्षाच्या 4, भारतीय  परिवर्तन सेनेचा 1 अशा उमेदवारांना  या  निवडणुकीत  निवडून  दिले आहे.
          त्याचप्रमाणे उस्मानाबादमधील 8 तालुक्यातील पंचायत समितीकरिता  एकूण 110 जागांकरिता  एकूण 477 उमेदवारांमध्ये चुरस होती.
          यामध्ये उस्मानाबाद पंचायत समितीच्या 24 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 16,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 2,शिवसेनेच्या 3 तर भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
          परंडा पंचायत समितीच्या 10 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 07, शिवसेनेच्या 02 तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवाराला निवडून येण्यात यश मिळाले आहे.
वाशी पंचायत समितीच्या 6 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 02,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 02,शिवसेनेच्या 02 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
कळंब पंचायत  समितीच्या 16 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 10, शिवसेनेच्या 06 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
 लोहारा पंचायत समितीच्या 8 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या01,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 05 तर भारतीय जनता पक्षाच्या 02 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
उमरगा पंचायत समितीच्या 18 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 04,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 09,शिवसेनेच्या 02 तर भारतीय जनता पक्षाच्या 03उमेदवरांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
भूम पंचायत समितीच्या 10 जागांकरिता  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला 05, भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 01,शिवसेनेला 03 तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवारांला निवडून येण्यात यश मिळाले आहे.
तुळजापूर पंचायत समितीच्या 18जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 06,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 11, तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवाराला निवडून येण्यात यश मिळाले आहे.

मतदान मोजणीच्या ठिकाणी कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी जिल्हा  प्रशासनाकडून योग्य तो  बंदोबस्त  ठेवण्यात  आला होता. कोठेही  अनुचित  प्रकार  न घडता  मतमोजणी  शांततेत  पार  पडली. विजयी  उमेदवारांचे  प्रशासनामार्फत  अभिनंदन  करण्यात  आले.

उस्मानाबाद जिल्हा परिषद पंचायत समिती पक्षनिहाय बलाबल

उस्मानाबाद  जिल्हा परिषद
एकूण जागा -55
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 04
राष्ट्रवादी - 26
शिवसेना - 11
भाराकाँ - 13
भारतीय परिवर्तन सेना -01


 उस्मानबाद पंचायत समिती
एकूण जागा - 24
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 03
राष्ट्रवादी - 16
शिवसेना - 03
परंडा पंचायत समिती
एकूण जागा - 10
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 01
राष्ट्रवादी - 07
शिवसेना -02
वाशी  पंचायत समिती
एकूण जागा - 06
पक्षनिहाय बलाबल
राष्ट्रवादी – 02
शिवसेना -02
भाराकाँ - 02
कळंब  पंचायत समिती
एकूण जागा - 16
पक्षनिहाय बलाबल
राष्ट्रवादी - 10
शिवसेना - 06

लोहारा  पंचायत समिती
एकूण जागा - 08
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 02
राष्ट्रवादी - 01
भाराकाँ – 05

उमरगा पंचायत समिती
एकूण जागा - 18
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 03
राष्ट्रवादी – 04
भाराकाँ - 09
शिवसेना – 02

भूम पंचायत समिती
एकूण जागा - 10
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 01
राष्ट्रवादी – 05
भाराकाँ - 01
शिवसेना – 03

तुळजापूर  पंचायत समिती
एकूण जागा - 18
पक्षनिहाय बलाबल
भाजपा- 01
राष्ट्रवादी - 06
भाराकाँ - 11


#जिमाका उस्मानाबाद 

Saturday, 18 February 2017

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन





शिवाजी  चौकात  छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या  पुतळयास  पुष्पहार  अर्पण  करून  जिल्हाधिकाऱ्यांनी  केले  अभिवादन
उस्मानाबाद,दि.19: उस्मानाबाद शहरातील मुख्य चौकातील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास  पुष्पहार अर्पण  करून  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत  नारनवरे  यांनी  अभिवादन  केले.
यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, नगराध्यक्ष मकरंदराजे  निंबाळकर  आदी  मान्यवर  उपस्थित  होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
           नायब तहसिलदार (सा. प्र) ए.जे. पठाण यांच्या हस्ते  छत्रपती  शिवाजी  महाराज  यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करून  अभिवादन  करण्यात  आले. यावेळी  रवि  मोहिते, बजरंग केंद्रे, एम.जे. शेख, के.एस. गायकवाड, दत्ता पवार, एस. एस. चव्हाण, एस. टी.  सुरवसे, श्रीमती  एस. के. भलेराव  आदीसह  जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी  व  कर्मचारी  यावेळी  उपस्थित  होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा माहिती  कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद,दि. 19:- छत्रपती  शिवाजी  महाराज  यांच्या  जयंतीनिमित्त  जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन  करण्यात आले. जिल्हा  माहिती  अधिकारी  मनोज  शिवाजी  सानप यांच्या  हस्ते  प्रतिमेस  पुष्पहार  अर्पण  करून  अभिवादन  करण्यात  आले.

यावेळी  भिमा पडवळ, श्रीमती  आशा  बंडगर, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर  कोंपले  हे   उपस्थित होते.                                      *****