Monday, 3 August 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी ; खडकी येथे १० ते १२ ऑगस्टदरम्यान भरती
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी ;
खडकी येथे १० ते १२ ऑगस्टदरम्यान भरती
धाराशिव,दि.३ ऑगस्ट (जिमाका) माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर, खडकी (पुणे) येथे युनिट हेडक्वार्टर कोट्याअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली असून,ही भरती दि.१० ऑगस्ट २०२६ ते दि.१२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे माजी सैनिकांच्या पाल्यांना भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवेचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांनी या अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक्वार्टर कोटा) या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
******
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.३ ऑगस्ट (जिमाका) देशसेवेची परंपरा पुढे नेण्याची संधी माजी सैनिकांच्या पाल्यांना उपलब्ध झाली असून,१ ई.एम.ई. सेंटर,सिकंदराबाद (तेलंगणा) येथे युनिट हेडक्वार्टर कोट्याअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे.ही भरती दि.२९ ऑगस्ट २०२६ ते दि.११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
देशाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा पुढे नेत राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी पात्र युवकांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक्वार्टर कोटा) या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*******
माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी व महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक भरतीची सुवर्णसंधी
माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी व महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक भरतीची सुवर्णसंधी
धाराशिव,दि.३ जुलै (जिमाका) माजी सैनिकांच्या पत्नी,माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांच्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
मेस्को,धाराशिव येथे होणाऱ्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे.तसेच कामगार कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.),कर्मचारी राज्य विमा योजना (ई.एस.आय.),ग्रॅज्युएटी आदी सुविधांचाही लाभ मिळणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्य यांनी अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच सर्व इच्छुकांनी आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह दि.५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव,दूरध्वनी : ०२४७२ -२२२५५७,भ्रमणध्वनी : ७५८८५२७५५४,
श्री.गंगाधर गायकवाड : (९४२२३०७५९३)
श्री. बबन कोळी (८०११४१४३६०)
यांचेशी संपर्क साधावा.
*******
Subscribe to:
Posts (Atom)