Monday, 3 August 2026
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन
माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी; राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.३ ऑगस्ट (जिमाका) देशसेवेची परंपरा पुढे नेण्याची संधी माजी सैनिकांच्या पाल्यांना उपलब्ध झाली असून,१ ई.एम.ई. सेंटर,सिकंदराबाद (तेलंगणा) येथे युनिट हेडक्वार्टर कोट्याअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे.ही भरती दि.२९ ऑगस्ट २०२६ ते दि.११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
देशाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची इच्छा असलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा पुढे नेत राष्ट्रसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी पात्र युवकांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या अग्निवीर सैन्य भरती (युनिट हेडक्वार्टर कोटा) या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*******