Tuesday, 1 October 2019

नवरात्र महोत्सवात विविध यंत्रणेकडून तत्पर सेवा


शारदीय नवरात्र महोत्सव-2019







         उस्मानाबाद,दि.01:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, कर्नाटक  या राज्यामधून यात्रेकरु मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. या भाविकांना सुविधा देण्याचे काम शासन यंत्रणेमार्फत उत्तम प्रकारे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी नियोजन केल्यामुळे भावीकांना आई तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी साधारण दोन  तास लागत आहेत. मंदिरात भावीकांची गर्दी जरी असली तरी  पोलीस यंत्रणा जागोजागी थांबून गर्दीवर नियंत्रण ठेवत आहे. भावीकांना आईतुळजा भवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे  व पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन हे सर्व ठिकाणी जातीने फिरुन आपले कर्तव्य बजावतांना दिसत आहेत.  शहरामध्ये येणा-या वाहनासाठी नगर पालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनाचा त्रास चालणा-या भावीकांना होणार नाही,याची दक्षता घेतली आहे. एस. टी स्टॅन्डवर भावीकांची धांदल होवू नये, म्हणून खास यंत्रणा स्पेशल एस.टी.बसची सोय केल्यामुळे भावीक सुखरुप आप-आपल्या गावी परतत आहेत. आरोग्य विभागामार्फत आरोग्य सुविधा उत्मरीत्या दिल्या जात असून औषधांचा साठा देखील प्रत्येक आरोग्य केंद्रावर असल्याचे दिसले.
              श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदिरावरुन टेहळणी करण्यासाठी देखिल पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. भावीकांना त्रास होवू नये, म्हणून वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला असून मंदिराजवळील कचरा वेळोवेही उचण्यासाठी नगर परिषदेचे वाहने कार्यरत आहेत. तसेच दुरघटना होणार नाही याची पूर्णदक्षता घेण्यात आली असून विविध यंत्रणंकडून अग्नीशमनदल,रुग्णवाहिका, कंट्रोल रुम, सार्वजनिक आरोग्य सेवा, बीडकर तलाव, क्लॉकरुम व चप्पलस्टँड, प्रवेशद्वार, पार्कींग-दर्शन रांगा, पाणपोई व प्रथमोपचार केंद्र, पोलीस चौकी, यांच्याकडून बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
            तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली. मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 30 September 2019

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा


शारदीय नवरात्र महोत्सव-2019




         उस्मानाबाद,दि.30: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज पहिली माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 02 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यात, दि. ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 03 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 04 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 03 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 06 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
            तत्पूर्वी, काल (रविवारी) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.


Sunday, 29 September 2019


शारदीय नवरात्र महोत्सव-2019





 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ
           उस्मानाबाद, दि.29: महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे रविवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.
            यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान मुकूंद संभाजी कदम (बाबर) यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा. शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. तसेच कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी वाहतूक मार्गावरुन चालतांना काळजी घ्यावी, असे आवाहन ही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे घटस्थापनेनंतर केले. त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळ्या गावातूनही युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे चालत येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह नगराध्यक्ष बापुसाहेब कने, महंत तुकोजी बुवा, महंत हयरुजी बुवा, महंत चिलोजी बुवा  पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.