*चला महाश्रमदान करू या..*
*उस्मानाबादला हरित*
*उस्मानाबाद करू या...!*
नमस्कार, शनिवार, दि. 29 जून सकाळी सहा ते दहा ही वेळ राखून ठेवा.
आपल्या उस्मानाबादला हरित उस्मानाबाद बनविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उत्साहपूर्ण मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रमदान मोहीम सुरू आहे.
आता शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय जागेत "महाश्रमदान" आयोजित करण्यात आले आहे.या जागेत साठवण तलावाची निर्मिती तसेच जास्तीत जास्त खड्डे खोदणे, चर खोदणे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे,त्याचे संगोपन करणे अशा प्रकारचे *"न भूतो न भविष्यती"* असे काम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि श्रमदानातून उभे राहणार आहे. यातूनच *"आपलं उस्मानाबाद हरित उस्मानाबाद"* दिसणार आहे.
*चला तर मग...नक्की या!*
*सगळ्यांनी या!*
या महाश्रमदानाकरिता विद्यार्थ्यांपासून ते शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या वृध्दांपर्यंत सर्वांना आवाहन आहे की, *शनिवार,दि.29 जून राेजी* *सकाळी सहा वाजता* *शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय आयुर्वेद* *महाविद्यालयाच्या मागील* *बाजूस असलेल्या मैदानात* जरूर यावे.
(येताना शक्य झाल्यास कुदळ, फावडे यासारखे साहित्य आणल्यास आपले स्वागतच आहे)
*PLEASE COME... LET'S DO IT !!*
Friday, 28 June 2019
चला महाश्रमदान करू *उस्मानाबादला हरित* *उस्मानाबाद करू या...!*
Thursday, 27 June 2019
बसवंतवाडी ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद,आदर्शवत आणि अनुकरणीय ---जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
बसवंतवाडी
ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद,आदर्शवत आणि अनुकरणीय
---जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.27:- बसवंतवाडी
गावाने स्वयंस्फूर्तीने दुष्काळातून मुक्त होण्यासाठी गेले महिनाभर कठोर परिश्रम
करून खोदलेले 4 हजार सीसीटी बंधारे कौतुकास्पद आहेत. बसवंतवाडी ग्रामस्थांचे काम
कौतुकास्पद,आदर्शवत आणि अनुकरणीय असून यापुढील काळात या कामास राज्य शासनाच्या
कृषी खात्यामार्फत अधिक प्रोत्साहन केले जाईल,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे यांनी केले.
संपर्क
संस्था, मुंबई अंतर्गत आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्याकडून सुरू असणाऱ्या
पाणीदार बसवंतवाडी मोहिमेमध्ये आज दि.27 जून रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे ,
पंचायत समिती
सभापती शिवाजी गायकवाड, तहसिलदार योगिता कोल्हे, तालुका कृषी अधिकारी नामदेव
गायकवाड,गुलचंद व्यवहारे,शामल पवार, प्रसाद पालवणकर, सुधीर कदम ,बाळासाहेब शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय जाधव, सरपंच श्रीमती देडे, उप सरपंच हरिभाऊ
भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत पारवे, आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश
महामुनी, आमदार चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबन जाधव, हिराजी डे, माजी सरपंच श्री.
पाटील, शालेय समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शीघ्र कवी प्रदीप पाटील, समाज सेवक
तानाजी शिंदे, समाजसेवक धनाजी धोतरकर, संभाजी बोबडे ,हनुमंत ताटे, ग्रामसेवक गोपाळ
करदोडे, ए. पी. ओ. किशोर शिंदे, पी. टी. ओ. श्रीपूर्ण कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे
रमाकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांचे स्वागत सरपंच
नंदाबाई देडे यांनी केले. पंकज पाटील, विकास भालेकर, भैरू मुळूक, हनुमंत पारवे, हरिभाऊ
भोसले यांच्या शुभहस्ते इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना 28
दिवसांमध्ये 4 हजार 300 सीसीटी बंधारे
खोदकाम करून बसवंतवाडी ग्रामस्थांनी दुष्काळाप्रति जागरूकता दाखवून दुष्काळाच्या
संकटातून मुक्त होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सलग एक महिना केलेले श्रमदान
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिशादर्शक आहे. याचे अनुकरण इतर दुष्काळग्रस्त गावांनी
करावे. उमेद महिला बचत गटामधून सर्व भागांमध्ये महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महिलांचे
वाढते योगदान स्पष्ट करणारे आहे. उमेद गटामधून शेळी वाटपाचे कार्यक्रम महिलांनी
हाती घ्यावे, त्यामुळे दर तीन आणि सहा महिन्यांनी महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढीस
लागेल,असे सांगितले.
त्या
पुढे म्हणाल्या, सीसीटी बंधारे खोदकाम केल्यामुळे बसवंतवाडी गावाचे पाणीटंचाईचे
संकट भविष्यात निश्चित दूर होणार आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून
बसवंतवाडी हे हिरवेगार नंदनवन होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. राज्य
शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवड आणि इतर योजनांचा लाभ घेऊन आपले
आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे मार्ग निर्माण करावेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य
करण्यास जिल्हा प्रशासन तयार आहे. भविष्यामध्ये बसवंतवाडी हे गाव महाराष्ट्र
राज्याच्या नकाशावर एक विकसित गाव म्हणून पुढे यावे आणि त्यामध्ये आमदार संवाद मंच
तुळजापूर यांनी घेतलेला पुढाकार देखील कौतुकास्पद आहे. सर्वांनी एकजुटीने पक्षीय
मतभेद दूर सारून हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले आहे, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत.
यावेळी
बसवंतवाडीमधील महिला भगिनींना गवार, मेथी, टोमॅटो,पालक, भोपळा, मुळा, शेपू , भेंडी,
काकडी, मिरची, वांगे या भाज्या घरच्या घरी मिळाव्यात, यासाठी लोकप्रबोधन संस्था,आरळी (बु) या संस्थेच्या वतीने अध्यक्ष धनाजी
धोतरकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना भाज्यांच्या
बियाण्यांची पाकीटे भेट देण्यात आले.
याप्रसंगी
पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड यांनी बसवंतवाडी या गावासाठी आमदार संवाद मंच
तुळजापूर पुढील कालावधीत विकासाचा आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करून
विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसहभागामधून
शासकीय योजना राबविल्यास त्यामधून होणारी गावाची प्रगती मोलाची ठरणार आहे,
त्यादृष्टीने विविध 30 शासकीय योजना बसवंतवाडी येथे राबविण्यासाठी जाणीवपूर्वक
प्रयत्न केले जाणार आहेत असे सांगितले.
आमदार
संवाद मंच तुळजापूर चे अध्यक्ष डॉ. सतिष महामुनी यांनी प्रास्ताविक भाषण करताना
बसवंतवाडी हे गाव पाणीदार होण्याच्या अनुषंगाने जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले
आहे. संपूर्ण गावाचा या कामातील सहभाग हेच या यशाचे गमक आहे. नि:पक्षपातीपणे
लोकांचा सहभाग आणि प्रशासनाची मदत यामुळे बसवंतवाडीचा कायापालट होत आहे. पुढील पाच
वर्ष बसवंतवाडी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचा
विडा उचलला आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा.अविनाश ताटे यांनी व आभार संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक
अनिल आगलावे यांनी मानले.
जिल्हाधिकाऱ्यांची
बसवंतवाडी जिल्हा परिषद प्रशाळेस भेट
जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे यांचे जिल्हा परिषद प्रशाला, बसवंतवाडी येथे मुख्याध्यापक पोपट
उंबरे आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी यांच्या हस्ते स्वागत करून वृक्षारोपण
करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बसवंतवाडी येथे भेट दिल्यामुळे गेल्या महिनाभरापासून श्रमदान करणाऱ्या
सर्व ग्रामस्थांना मनापासून आनंद झाल्याचे चित्र होते. मात्र वयोवृद्ध अनेक
महिलांनी शासनाने आमच्या पोटासाठी काहीतरी दिले पाहिजे म्हणून मनरेगा अंतर्गत
कामाची मागणी केली तेव्हा जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी पुढील कामासाठी
आपण आजच मंजुरी देत असून संबंधित यंत्रणांनी कृषी विभागाच्या सूचनेनुसार मनरेगा
अंतर्गत पुढील काम करावे, असे आदेश दिले.
*****
वृत्त क्रमांक-406
सावित्रीबाई
फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या
सिद्धेश
बाळकृष्ण भवर चा व्यसनमुक्ती पथनाट्यात सहभाग
उस्मानाबाद,दि.27:- शाहू महाराज
जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिनानिमित्त यश मेडिकल फाऊंडेशन व
फ्युजन डान्स ड्रामा अॅकडमी, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथे
शिवाजी चौक व यशवंतराव चव्हाण सभागृह येथे व्यसनमुक्तीची नाटिका सादर केली. यावेळी
जिल्हाधिकारी व वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी हजर होते.
सावित्रीबाई
फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथील स्काऊट गाईड पथकातील सिध्देश
बाळकृष्ण भवर याने या पथनाट्यात व नाटिकेमध्ये सहभाग घेऊन दारू,तंबाखू, गुटखा व
इतर मादक द्रव्य मानवी शरीरात किती
घातक आहेत, याचा जनतेला पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
****
वृत्त
क्रमांक-407
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त
भैरवनाथ कानडे यांच्या "राजर्षी शाहूंचे
शैक्षणिक विचार"पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
उस्मानाबाद,दि.27:- तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील
सहशिक्षक तथा पत्रकार भैरवनाथ खंडू कानडे यांच्या "राजर्षी शाहूंचे शैक्षणिक
विचार " या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती
निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती दीपा
मुधोळ-मुंडे व उस्मानाबादचे जिल्हा
पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या शुभहस्ते दि.
26 जून रोजी करण्यात आले.
सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने येथील सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी
शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात
आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ
-मुंडे , प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस
अधीक्षक आर .राजा यांच्या शुभहस्ते व सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त
शिवानंद चिकुर्ते, समाज कल्याण
अधिकारी नागेश चौगुले,प्रा. डॉ.सतिश यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू
महाराजांची शिक्षणविषयक भूमिका अधोरेखित करणाऱ्या भैरवनाथ कानडे यांनी संपादित
केलेल्या "राजर्षी शाहूंचे शैक्षणिक विचार" या पुस्तकाचे प्रकाशन मोठया
उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ कवी योगीराज माने ,दलित मित्र
शंकर खुणे ,सुधाकर सगट, कैलास पवार, नवनाथ उपळेकर, पद्मिनताई वाघमारे आदीसह डॉ.
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार व संत रविदास
पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त
विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Friday, 21 June 2019
सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना दैनंदिन जीवनात रुजवा - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योगसाधना
दैनंदिन जीवनात रुजवा
- जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद, दि.21- सुदृढ व
निरोगी राहण्यासाठी योगसाधना ही आपल्या दैनंदिन जीवनात रुजायला हवी आणि याचे धडे
बालवयापासूनच दिले गेले पाहिजेत, असे उद्गार जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे
यांनी आज येथे काढले.
पाचव्या
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर,
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सरकारी वकील ॲङ शरद जाधवर, नितीन
काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, तहसिलदार विजय राऊत, जिल्हा विधीज्ञ
मंडळाचे अध्यक्ष ॲङ रवींद्र भोसले, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, शिक्षणाधिकारी सविता
भोसले, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक
धनंजय काळे, विकास कुलकर्णी, सहाय्यक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा
अधिकारी सारिका काळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा
कुलकर्णी ,ब्रह्माकुमारी च्या सुरेखा बहेनजी, ॲड. व्यंकटराव गुंड हे उपस्थित होते.
प्रथम
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात
आला. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा व जिल्हाधिकारी
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी योग दिनाच्या निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.
विकास गपाट, पतंजलीचे राज्य प्रभारी नितीन तावडे, राम ढेरे यांनी उपस्थितांकडून
योग क्रिया करून घेतल्या. त्याचप्रमाणे डॉ. सायली मोरे यांनी ध्यानाचे महत्त्व
सांगून उपस्थितांकडून ध्यान क्रिया करून घेतल्या.
कार्यक्रमासाठी
शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते,
महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे चंद्रशेखर सुरवसे, अनुरत्ना नागटिळक, विवेक
गोवर्धन, रोहिदास सौदागर, अशोक रणसुभे, रविराज देडे, चंद्रकांत गिलबिले, आर्ट ऑफ
लिव्हिंगचे श्रीराम सोनटक्के, रोटरी क्लबचे अभिजित पवार, एकता फाउंडेशनचे अभिलाष लोमटे,
प्रजापिता ब्रह्मकुमारी चे सुरेश जगदाळे, प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे
भवानीसिंग
राजपुरोहित, उस्मानाबाद मॅरेथॉनचे गिरीश आष्टगी,भारत
स्काऊट अँड गाईड चे उपाध्यक्ष अविनाश हंगे, अनुसया शिरसाट, जनार्दन इरले, वैभव
लांडगे, रविकांत सुरवसे, प्रशांत मते, विजयकुमार कोळगे, सोमनाथ कुंभार, अश्विनी
थोरात यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तर आभार
प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले.
****
वृत्त क्रमांक 383
मुरघास तयार करण्याच्या योजनेचा
इच्छुकांनी लाभ घ्यावा
-जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी
उस्मानाबाद,
दि.21- राष्ट्रीय कृषी विकास योजना
2019-20 अंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे, या
योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना द्यावयाचा आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी
अर्जाच्या स्वरूपातील प्रस्ताव आपल्याशी निगडित असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत
संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि.22
जून ते 01 जुलै 2019 या कालावधीत सादर
करावेत, तसेच अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती
याबाबतचा सविस्तर तपशील संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असेल.
तरी
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव यांनी केले आहे.
****
वृत्त क्रमांक:-384
पोटनिवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर
मद्यविक्री
बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
उस्मानाबाद,दि.21- जिल्ह्यातील
ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर,
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व सिंदफळ, उमरगा
तालुक्यातील तुगाव, वाशी
तालुक्यातील पारगाव, भूम तालुक्यातील आष्टा व बावी या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होत असून त्या
अनुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वी 48
तास अगोदर मद्य विक्री करण्यास
मनाई/कोरडा दिवस म्हणजेच दि. 21 जून रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 23 जून 2019
रोजी चा मतदानाचा संपूर्ण दिवस व दि. 24 जून रोजी मतमोजणी असल्याने मतमोजणी
संपेपर्यंत मतमोजणी होणाऱ्या ठिकाणी म्हणजेच
उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा,वाशी, भूम,कळंब या शहरातील सर्व प्रकारचे घाऊक व किरकोळ
मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे व त्यावरील मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश
देण्यात आले आहेत.
या आदेशाचे
उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
****
वृत्त
क्रमांक 385
किलप्ले पेस्टीसाईड, इंदोर फोरेट
(प्रोटोन) उत्पादित
सोरेटच्या जिल्हयात
विक्री बंदीचे आदेश जारी
तपासणी अहवालात आढळून आले 0% घटक
उस्मानाबाद,दि.21- महावीर कृषी
सेवा केंद्र, कळंब येथील कृषी सेवा केंद्राची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.
उमेश घाडगे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. जाधव यांनी अचानक तपासणी
केली होती. त्यामध्ये किलप्ले पेस्टीसाईड, इंदोर उत्पादित फोरेट 10 टक्के G (ब्रँड- प्रोटोन 10G), बॅच नंबर KPP -38, या किटकनाशकाचा
साठा आढळून आला.
किटकनाशक कायदा
1968 अन्वये हा नमुना काढून कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीकरिता
पाठविला होता. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाला असून विश्लेषण अहवालानुसार फोरेट किटकनाशकाचे
शून्य टक्के घटक आढळून आल्याने याचे जिल्हाभरात तात्काळ विक्री बंदीचे आदेश जारी
करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 3 हजार
447 किलो (रुपये रक्कम 2 लाख 41 हजार 290) विक्री बंदीचे आदेश पारित करण्यात आले,
असून कीटकनाशक कायदा 1968 व नियम 1971 अन्वये पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात
येत आहे.
तरी या बॅचचे
फोरेट शेतकऱ्यांनी खरेदी करू नयेत तसेच शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी
करीत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी
करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल
नंबरची नोंद करून घ्यावी, बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पावती,
पिशवी,टॅग व
त्यातील थोडे बियाणे हंगाम
संपेपर्यंत जतन करून ठेवावेत, बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी,त्यावरील
अंतिम मुदत पाहून घ्यावी, नामांकित कंपनीची बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत,
कमी वजनाच्या निविष्ठा, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्रीबाबत तक्रार असल्यास
नजिकच्या तालुका कृषी अधिकारी/पंचायत समिती कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाडगे यांनी केले आहे.
****
वृत्त
क्रमांक-386
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेतून
गो-शाळा अनुदानासाठी
इच्छुक गो-शाळाधारकांनी अर्ज करावेत
उस्मानाबाद,दि.21- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र, ही नवीन योजना सन 2019-20
या आर्थिक वर्षापासून जिल्ह्यातील तीन विभागीय महसूल मंडळातून प्रत्येकी एक
याप्रमाणे अनुदानासाठी गो-शाळांची निवड करण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी,कळंब, उपविभागीय
अधिकारी, उमरगा या महसूल विभागात ही योजना राबविण्यात येणार आहे.
या
योजनेंतर्गत पशुधनासाठी नवीन शेड बांधकाम, चारा व पाण्याची व्यवस्था, कडबाकुट्टी
यंत्र, मुरघास प्रकल्प, गोमूत्र व त्यावरील प्रक्रिया प्रकल्प इत्यादी बाबींसाठी
अनुदान मिळणार आहे. या अनुषंगाने इच्छुक गो-शाळाधारकांनी संबंधित तालुक्याच्या
पशुधन विकास अधिकारी, (विस्तार)
यांच्यामार्फत परिपूर्ण प्रस्ताव उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन या कार्यालयास दि.30
जून पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे यांनी
केले आहे.
****
वृत्त
क्रमांक-387
शेतकऱ्याची फसवणूक केलेल्या परवानाधारक
आडते, मदतनीस, व्यापाऱ्यांचे परवाने
रद्द
उस्मानाबाद,दि.21- मालाचा कडता
म्हणून 50 क्विंटल पोत्यामागे एक किलो कडता घेत असल्याबाबत व सॅम्पल म्हणून टोपलीत
व्यापाऱ्याकडे नेलेला माल व्यापाऱ्याने परत न दिल्याबाबत तसेच हवा असल्याच्या
नावाखाली लिलावात मागणी केलेल्या भावापेक्षा कमी भावात खरेदी केल्याबाबत श्री. महेश
वीरेश गव्हाणे, राहणार मुरूम या शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
या सर्व
प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आता एम.व्ही.पाटील, अ वर्ग आडत,मुरूम, श्री. विठ्ठल
नरसिंग पाटील, मदतनीस, मुरूम, एल. एस. मिनियार, सं.गणेश लक्ष्मीकांत मिनियार, अ वर्ग
व्यापारी, मुरूम, गोविंद दाळमिल,सं.श्रीकांत श्रीकिशन मिनियार,अ वर्ग व्यापारी,
मुरूम या
चारही परवानाधारकांचे परवाने
रद्द करण्यात आले असून त्यांना 01जून 2019 पासून बाजार समिती, मुरूम च्या आवारात
नियंत्रित शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात भाग घेता येणार
नाही,त्यांना कुठल्याही प्रकारचा
व्यवहार करता येणार नाही, अशी नोटीस कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम चे सचिव
यांनी दिली आहे.
अशा प्रकारे
कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूम च्या आवारात परवानाधारक आडते, मदतनीस, व्यापारी
यांनी शेतकऱ्याच्या केलेल्या फसवणुकीबाबत शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत
जिल्ह्याच्या सर्व स्तरातून शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)



