Saturday, 18 November 2017

जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे


उस्मानाबाद.दि.18:- दुष्काळमुक्त जिल्हा, राज्य हा आपला सर्वांचा संकल्प आहे. त्यासाठी पाण्याचा थेंब नी थेंब वाचवायचा आहे, साठवायचा आहे, यासाठी जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे  प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले.
परंडा तालुक्यातील हिंगणगाव(बु) येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली गावातील यमाई देवीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, उप अभियंता श्री.मोरे, सौदार गोरे, बळीराम मारकड, तुकाराम कुरुंद, नाना कदम, पंडीत गोरे, राहुल ठोंगे, प्रविण नवले, ज्ञानेश्वर ठोंगे, राहुल कुरुंद, अमोल दरेकर, सागर ठोंगे, अनुरुद्र गोरे, विजय कुरुंद  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की,  जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून ज्या पध्दतीने जलयुक्त शिवारचे काम चालू आहे त्यातून दुष्ळाळी परिस्थिती परत निर्माण होवूच शकणार नाही, या कामासाठी अजून निधी लागला तर निधी दिला जाईल.
यावेळी आमदार श्री.ठाकूर यांनी जलयुक्त शिवार च्या माध्यमातून या जिल्ह्यात, या तालुक्यात झालेल्या कामांमुळे दुष्काळ नक्की मिटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी जलयुक्त च्या कामासाठी चार कोटीचा सर्वाधिक निधी मंजूर केल्याबदद्ल त्यांचे आभार व्यक्त केले.

जलसंधारण विभागांतर्गत हिंगणगाव(बु) येथील बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी करुन जलपूजन केले.

Friday, 17 November 2017

विकासाबद्दलची संकल्पना माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे



उस्मानाबाद.दि.17:- विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.कावेरी बने यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त “माध्यमासमोरील आव्हाने” या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रा.कावेरी बने  बोलत होत्या.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना प्रा. कावेरी म्हणाल्या की, विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.ज्यांच्यापर्यंत इंटरनेट  सुविधा पोहचत नाही त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम प्रिंट माध्यमांनी करावे. राजकारणी व उद्योगपतीकडे माध्यमांचे जेवढे लक्ष असते तेवढेच लक्ष माध्यमांनी समाजातील सर्वसामान्य लोकांकडे असणे गरजेचे आहे. पत्रकारांची भूमिका महत्वाची असून माध्यम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा उपयोग प्रभावीपणे पत्रकाराने करावा.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रणदिवे यांनी माध्यमासमोरील आव्हाने, पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य तसेच पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.मोरे यांनीही उद्योजकता या विषयावर पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर निसर्गोपचार पध्दती व पा्रत्याक्षिक आरोग्य शिबिरात डॉ.मनोज साळुंके व डॉ.गवळी  यांनी पत्रकरांना धावपळीचे जीवन जगावे लागत असल्याने आहार कसा असावा तसेच विविध शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय व व्याधी होऊच नये म्हणून घेण्यात येणारी काळजी यावरील आयुर्वेदिक उपचार पध्दती  याविषयी  सविस्तर माहिती दिली.


प्रास्‍ताविक व आभार जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. यावेळी राष्‍ट्रीय पत्रकार दिनाच्‍या आयोजनाबद्दल माहिती दिली. जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, देवीदास पाठक, शिला उंबरे, श्री.जी.बी.रजपूत, गिरिष जव्हेरी, पांडूरंग मते, नरसिंग खिचडे, प्रशांत कावरे, संतोष जाधव, हुंकार बनसोडे, प्रमोद राऊत, भाऊसाहेब अणदुरकर, अरुण गंगावणे, शाहरुख सय्यद, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत कुलकर्णी, दत्तात्रय गायके, आकाश नरोटे, बिभीषण लोकरे, महेबुब फकीर, गंगावणे राजकुमार, रामेश्वर डोंगरे, धनंजय पाटील, योगेश कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, निमजे ज्योतीराम, संजय रेणुके आदीसह जिल्हृयातील सर्व पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, 16 November 2017

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जलयुक्त शिवार अभियान - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे





उस्मानाबाद.दि.16:- पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे दरवर्षी दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, त्यामुळे पाण्याचे महत्तव ओळखून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली.       
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन शिरासे, गजानन वडणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, साहेबराव घुगे,ॲड.अनिल काळे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, सचिन घोडके, इंद्रजित देवकते, पद्माकर घेडके,  सत्यवान सुरवसे, आबा करमुळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
            मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होवून त्यांचा विकास होणार आहे.
            आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट बंधारे, नदी, नाले खोलीकरण यासारख्या कामांना निधीची मागणी केली होती. त्यांच्या निधी मागणी प्रस्तावास मान्यता देत जिल्हयास 4 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली.
            जलसंधारण विभागांतर्गत माळुंब्रा येथे 9.56 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी केली. त्याचबरोबर मौ.मसला दहीवडी येथे पाझर तलाव दुरुस्ती, तुळजापूर खुर्द येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करुन यावेळी मंत्री.प्रा.शिंदे यांनी जलपुजन केले.