Wednesday, 7 June 2017

राष्ट्रीय बाल कल्याण,राजीव गांधी मानवसेवा व विशेष नैपुण्य पुरस्कारासाठी 20 जून पर्यंत अर्ज करावेत


उस्मानाबाद दि.7:- राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार सन 2016, राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार सन 2017  व विशेष नैपुण्य पुरस्कार 2017 करिता नामांकनासाठी  दि.20 जून 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

या पुरस्काराचे नियमावली व निकष केंद्रशासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तरी इच्छुक व्यक्तीनी व संस्थानी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळ मजला रुम नंबर 10 उस्मानाबाद येथे दि.20 जून 2017 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.आर.जी.बांगर यांनी केले आहे.

सहपालकमंत्री महादेव जानकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानाबाद.दि.7:-राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री उस्मानाबाद महादेव जानकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील-
गुरुवार दि. 8 जून 2017 रोजी पहाटे 4.40 वाजता उस्मानाबाद रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण.सकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानबाद येथे आगमन व राखीव.सकाळी 9.40 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानबाद येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.
सकाळी 10.00 वाजता जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 व 2016-17 बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात.दुपारी 4.10 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबादकडे प्रयाण.दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय मोटारीने जिल्हा औरंगाबादकडे  प्रयाण.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

           
उस्मानाबाद दि.7:- राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दि. 11 व 12 जून 2017 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

रविवार दि. 11 जून 2017 रोजी दुपारी 2 वाजता लातूर येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण.दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता उस्मानाबाद जिल्हा प्रमुख अनिल खोचरे (प्रभारी) यांचे समवेत चर्चेसाठी राखीव. (विधानसभा- उमरगा, तुळजापूर,उस्मानाबाद,परंडा). सायंकाळी 7 नंतर शासकीय वाहनाने श्री देवी क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन व पूजा विधी. रात्री शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे मुक्काम.सोमवार दि.12 जून 2017 रोजी पहाटे 6 वाजता श्री देवी क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन व पूजा विधी. सकाळी 7.30 वाजता शासकीय वाहनाने बीड  जिल्ह्याकडे प्रयाण करतील.