Tuesday, 8 September 2026
१२ सप्टेंबर रोजी माजी सैनिक संपर्क मेळावा
१२ सप्टेंबर रोजी
माजी सैनिक संपर्क मेळावा
धाराशिव दि.८ सप्टेंबर (जिमाका) दिनांक १२ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ९ वाजता आर्मड कोर आणि सेंटर, अहिल्यानगर येथील कर्नल कुलविंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक संपर्क मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील माजी सैनीकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी विविध अभिलेख कार्यालयाचे व बँकेचे अधिकारी / प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हयातील सर्व माजी सैनिक माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्नी/वीरमाता यांनी दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धाराशिव यांनी केले आहे.
00000