Thursday, 10 September 2026
अँग्री-स्टॅक नोंदणीत उमरगा आघाडीवर ; जिल्ह्यात ८३.४८ टक्के काम पूर्ण * ४.७७ लाख खातेदारांपैकी ३.९८ लाख नोंदणीकृत * एका दिवसात ३४ नोंदींची भर
अँग्री-स्टॅक नोंदणीत उमरगा आघाडीवर ; जिल्ह्यात ८३.४८ टक्के काम पूर्ण
* ४.७७ लाख खातेदारांपैकी ३.९८ लाख नोंदणीकृत
* एका दिवसात ३४ नोंदींची भर
धाराशिव दि.१० सप्टेंबर (जिमाका) शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या अँग्री-स्टॅक नोंदणीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यातील एकूण ४ लाख ७७ हजार ४४ खातेदारांपैकी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत ३ लाख ९८ हजार २४२ खातेदारांची नोंदणी पूर्ण झाली असून,जिल्ह्याचे एकूण काम ८३.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत ही संख्या ३ लाख ९८ हजार २०८ होती.त्यामुळे एका दिवसात आणखी ३४ खातेदारांची नोंदणी झाली.
तालुकानिहाय कामगिरीत उमरगा तालुका ८८.४३ टक्क्यांसह जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कळंब ८७.७८,वाशी ८६.५३,लोहारा ८५.५१,परंडा ८४.१८,भूम ८२.१६ आणि धाराशिव ८१.२१ टक्के नोंदणी झाली आहे.तुळजापूर तालुक्यात ७७.८७ टक्के नोंदणी झाली असून जिल्ह्यात ती सर्वांत कमी आहे.
एका दिवसातील नोंदणीमध्ये उमरग्यात सर्वाधिक १०,परंड्यात ६,लोहारा व तुळजापूरमध्ये प्रत्येकी ५,वाशीत ४, धाराशिवमध्ये २,तर भूम व कळंबमध्ये प्रत्येकी १ नोंद झाली.डिजिटल नोंदणीचा टप्पा वेगाने पूर्ण होत असताना उर्वरित खातेदारांची नोंदणी पूर्ण करण्यावर आता प्रशासनाचा भर राहणार आहे.
०००००००००००