Tuesday, 8 September 2026
ई-पीक पाहणीला वेग ; जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ८४० प्लॉटचे सर्वेक्षण * एकूण सर्वेक्षण ४७.१० टक्क्यांवर * उमरगा, तुळजापूर आघाडीवर शेतातील पीक नोंदीपासून शासकीय लाभाच्या प्रक्रियेपर्यंत ई-पीक पाहणी महत्त्वाची
ई-पीक पाहणीला वेग ; जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ८४० प्लॉटचे सर्वेक्षण
* एकूण सर्वेक्षण ४७.१० टक्क्यांवर
* उमरगा, तुळजापूर आघाडीवर
शेतातील पीक नोंदीपासून शासकीय लाभाच्या प्रक्रियेपर्यंत ई-पीक पाहणी महत्त्वाची
धाराशिव,दि.८ सप्टेंबर (जिमाका) शेतकऱ्याने आपल्या शेतात नेमके कोणते पीक घेतले आहे,किती क्षेत्रावर त्याची लागवड झाली आहे,याची अचूक आणि अद्ययावत नोंद उपलब्ध होण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची ठरत आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होण्याबरोबरच पीकविषयक विविध शासकीय प्रक्रियांमध्येही या नोंदी उपयुक्त ठरतात.त्यामुळे ई-पीक पाहणी ही केवळ प्रशासकीय नोंद न राहता शेतकऱ्याच्या शिवारातील वास्तव पीक परिस्थितीचे ‘डिजिटल प्रतिबिंब’ बनली आहे.
जिल्ह्यात ई-पीक पाहणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण ८ लाख ५५ हजार ३६३ प्लॉटपैकी ८ लाख २७ हजार ७०७ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.हे प्रमाण ९६.७७ टक्के आहे.
डिजिटल ई-पीक पाहणीच्या दैनिक अहवालानुसार, जिल्ह्यातील ७१९ गावांमध्ये ई-पीक पाहणीचे काम सुरू आहे. मंगळवार,८ सप्टेंबर रोजी ७८० प्लॉटचे सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत ३ लाख ८९ हजार ८४० प्लॉटचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून,त्याचे प्रमाण ४७.१० टक्के आहे.सर्वेक्षण पूर्ण झालेल्या प्लॉटपैकी ३ लाख ६३ हजार ९७६ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित आहेत, तर २५ हजार ८६४ प्लॉटला मान्यता देण्यात आली आहे. सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यता मिळालेल्या प्लॉटचे प्रमाण ७.११ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत हे प्रमाण ३.०२ टक्के आहे.या कामासाठी जिल्ह्यात १ हजार ९२२ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
उमरगा,तुळजापूरमध्ये ६० टक्क्यांहून अधिक सर्वेक्षण
तालुकानिहाय आकडेवारी पाहता ई-पीक सर्वेक्षणाच्या टक्केवारीत उमरगा आणि तुळजापूर आघाडीवर आहेत.उमरगा तालुक्यातील ९६ गावांमध्ये १ लाख ४ हजार ९५७ प्लॉट असून, त्यापैकी १ लाख ४ हजार ९५६ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.सर्वेक्षणासाठी प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण जवळपास १०० टक्के आहे.मंगळवारी १४७ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत ६३ हजार ७९ प्लॉटचे म्हणजेच ६०.१० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.यापैकी ५४ हजार ५१८ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून, ८ हजार ५६१ प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यता मिळालेल्या प्लॉटचे प्रमाण १५.७० टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत ८.१६ टक्के आहे.येथे २७८ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
तुळजापूर तालुक्यातील ११६ गावांमध्ये १ लाख २९ हजार ३७८ प्लॉट असून,सर्व १ लाख २९ हजार ३७८ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.मंगळवारी १३२ प्लॉटचे सर्वेक्षण झाले. आतापर्यंत ७७ हजार ७६५ प्लॉटचे म्हणजे ६०.११ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी ७४ हजार ५६५ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून, ३ हजार २०० प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण ४.२९ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत २.४७ टक्के आहे.येथे ३१२ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
कळंब तालुक्यातील ९८ गावांमध्ये १ लाख २८ हजार ४२८ प्लॉट आहेत.त्यापैकी १ लाख २८ हजार २६३ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले असून,त्याचे प्रमाण ९९.८७ टक्के आहे.मंगळवारी ६६ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत ६५ हजार ७२४ प्लॉटचे म्हणजे ५१.२४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी ६३ हजार ४५० प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून, २ हजार २७४ प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षणाच्या तुलनेत मान्यता मिळालेल्या प्लॉटचे प्रमाण ३.५८ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत १.७७ टक्के आहे.येथे ३३९ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
वाशी तालुक्यातील ५३ गावांमध्ये ८३ हजार ३४ प्लॉट असून,सर्व प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.हे प्रमाण १०० टक्के आहे. मंगळवारी १११ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत ४१ हजार ५४८ प्लॉटचे म्हणजे ५०.०४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी ३८ हजार ५११ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून, ३ हजार ३७ प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण ७.८९ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत ३.६६ टक्के आहे.येथे १९१ सर्वेक्षक कार्यरत आहेत.लोहाऱ्यात प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण शंभर टक्के
लोहारा उपजिल्ह्यातील ४७ गावांमध्ये ४८ हजार २७३ प्लॉट असून,सर्व प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.त्यामुळे प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.मंगळवारी ५६ प्लॉटचे सर्वेक्षण करण्यात आले.आतापर्यंत २२ हजार ९९८ प्लॉटचे म्हणजे ४७.६४ टक्के सर्वेक्षण झाले आहे. त्यापैकी १९ हजार ९८३ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून,३ हजार १५ प्लॉटना मान्यता मिळाली आहे.सर्वेक्षणाच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण १५.०९ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत ६.२५ टक्के आहे.येथे ९५ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
धाराशिव तालुक्यातील १२५ गावांमध्ये १ लाख ४४ हजार ९७४ प्लॉट असून, त्यापैकी १ लाख २९ हजार २८४ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.हे प्रमाण ८९.१८ टक्के आहे. मंगळवारी ११६ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत ५० हजार ५९४ प्लॉटचे म्हणजे ३९.१३ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी ४९ हजार ५१० प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून,१ हजार ८४ प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण २.१९ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत ०.७५ टक्के आहे. येथे ३४८ सर्वेक्षक कार्यरत आहेत.भूम तालुक्यातील ९३ गावांमध्ये १ लाख २२ हजार ३२ प्लॉट असून, त्यापैकी १ लाख ११ हजार ४९४ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण ९१.३६ टक्के आहे. मंगळवारी ९८ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत ४४ हजार ७९१ प्लॉटचे म्हणजे ४०.१७ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी ४२ हजार २३८ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून,२ हजार ५५३ प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण ६.०४ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत २.०९ टक्के आहे. येथे १६९ सर्वेक्षक कार्यरत आहेत.
परंडा तालुक्यातील ९१ गावांमध्ये ९४ हजार २८७ प्लॉट असून, त्यापैकी ९३ हजार २५ प्लॉट सर्वेक्षणासाठी नेमून देण्यात आले आहेत.प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण ९८.६६ टक्के आहे.मंगळवारी ५४ प्लॉटचे सर्वेक्षण झाले.आतापर्यंत २३ हजार ३४१ प्लॉटचे म्हणजे २५.०९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.त्यापैकी २१ हजार २०१ प्लॉट मान्यतेसाठी प्रलंबित असून, २ हजार १४० प्लॉटना मान्यता देण्यात आली आहे.सर्वेक्षण झालेल्या प्लॉटच्या तुलनेत मान्यतेचे प्रमाण १०.०९ टक्के,तर एकूण प्लॉटच्या तुलनेत २.२७ टक्के आहे.येथे १९० सर्वेक्षक कार्यरत आहेत.
शेतातील वास्तव नोंदीचे डिजिटल प्रतिबिंब
शेतकऱ्याच्या बांधावर उभे असलेले पीक आणि शासकीय नोंदीतील पीक यामध्ये अचूकता असणे महत्त्वाचे आहे.ई-पीक पाहणीमुळे शेतनिहाय पीक पद्धतीची अधिक अचूक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होण्यास मदत होते.एखाद्या भागात कोणत्या पिकाचे किती क्षेत्र आहे, पेरणीची स्थिती काय आहे आणि पीक क्षेत्रात कसा बदल झाला आहे,याचे वास्तव चित्र उभे करण्यासाठी या नोंदी महत्त्वाच्या ठरतात.
विशेषतः पावसातील खंड, अतिवृष्टी,दुष्काळसदृश परिस्थिती किंवा अन्य नैसर्गिक संकटांच्या काळात शेतातील प्रत्यक्ष पीक परिस्थितीची नोंद असणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते.यंदा पावसातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत नोंद होण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ई-पीक पाहणीतील अचूक नोंदींमुळे प्रशासनालाही प्रत्यक्ष पीक परिस्थिती समजून घेणे, कृषीविषयक नियोजन करणे आणि आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध होण्यास मदत होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त पिकांची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होण्यासही या डिजिटल नोंदी उपयुक्त ठरतात. त्यामुळे ई-पीक पाहणी ही केवळ आकडेवारी किंवा प्रशासकीय प्रक्रिया नसून,शेतकऱ्याच्या शिवारातील पीक परिस्थिती आणि शासनाच्या यंत्रणेला जोडणारा महत्त्वाचा डिजिटल दुवा ठरत आहे.
जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी प्लॉट नेमून देण्याचे प्रमाण ९६.७७ टक्क्यांपर्यंत पोहोचले असले,तरी प्रत्यक्ष सर्वेक्षण ४७.१० टक्के पूर्ण झाले आहे.त्यामुळे आता उर्वरित प्लॉटची ई-पीक पाहणी पूर्ण करण्याबरोबरच सर्वेक्षण पूर्ण झालेल्या प्लॉटच्या मान्यता प्रक्रियेलाही वेग देणे आवश्यक आहे.प्रत्येक शेतातील पीक परिस्थितीची अचूक डिजिटल नोंद पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या पीकविषयक शासकीय प्रक्रियांसाठी विश्वासार्ह माहितीचा मजबूत आधार तयार होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्वरित ई पीक पाहणी पूर्ण करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
०००००००००००००००
