Thursday, 10 September 2026
जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू
जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू
धाराशिव दि.१० सप्टेंबर (जिमाका) जिल्हयात दि.१४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री.गणेश उत्सव निमित्त जिल्हाभर दिनांक १४ ते २६ सप्टेंबर पावेतो विविध पक्ष संघटना व मंडळाकडून मिरवणूक,रॅली , शोभायात्रा आयोजित करण्यात येतात.
मिरवणूक,रॅली,शोभायात्रा प्रसंगी आयोजकांकडून प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठया प्रमाणात वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहानमुले,वयोवृध्द,जेष्ठ नागरीक, सामान्य नागरीक यांचे डोळयास इजा होवून त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सदर प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तरी दि.१४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत साजरे होणारे जयंती उत्सव अनुषंगाने प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करु नये म्हणून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ प्रमाणे बंदी आदेश संपूर्ण धाराशिव जिल्हयात जारी करण्याची विनंती केली आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) या कलमांखाली जेथे कोणत्याही कारणांने नागरीकांच्या जिवीतास अथवा आरोग्यास धोका निर्माण होईल असे पुरेसे कारण असेल तेंव्हा तात्काळ प्रतिबंध करण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यामध्ये श्री गणेश उत्सव दरम्यान विविध पक्ष,संघटना व मंडळाकडून मिरवणुका,रॅली , शोभायात्रा शांततेच्या वातावरणांत पार पाडणे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. करिता दि.१४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत साजरे होणारे जयंती उत्सव अनुषंगाने मिरवणुका , रॅली ,शोभायात्रा मध्ये नागरीकांच्या डोळयांच्या सुरक्षेसाठी प्लाझमा,वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता - २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हयात श्री गणेश उत्सव दरम्यान विविध पक्ष,संघटना व मंडळाकडून मिरवणुका,रॅली, शोभायात्रा शांततेच्या वातावरणांत पार पाडणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या व नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने दि.१४ ते २६ सप्टेंबर रोजीपर्यंत मिरवणुका,रॅली, शोभायात्रामध्ये प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू करीत आहे.
000000