Friday, 21 June 2024

श्री.तुळजाभवानी स्टेडियम येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

श्री.तुळजाभवानी स्टेडियम येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा
धाराशिव दि.21(जिमाका) जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आयुष विभाग,नेहरू युवा केंद्र,पंतजली योग समिती,क्रीडा भारती,आर्ट ऑफ लिव्हींग,धाराशिव जिल्हा योग संघटना यांचे सहकार्याने आज 21 जुन रोजी सकाळी 7 वाजता श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल येथे पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी उपस्थितांकडुन प्रात्यक्षिक करुन घेतले.यावेळी अनुरत नागटिळक यांनी योगविषयक माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी राम ढेरे,महिला जिल्हा प्रभारी वैशाली उपासे,आर्ट ऑफ लिव्हीगचे डॉ विकास गपाट,क्रीडा भारतीचे अलका पवार,जिल्हा योगा संघटनेचे प्रवीण गडदे,जिल्हा स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे,क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत योग सत्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मल्हारी माने व सुरेश कळमकर आदींसह योगसाधक साधिका शहरातील नागरिक,युवक, युवत व खेळाडू यांच्यासह जवळपास 450 जणांची उपस्थिती होती. योग तज्ज्ञ राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक क्रीडा अधिकारी बी.के.नाईकवाडी यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी मानले.

योगा ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

योगा ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २१ : निरोगी शरीरासाठी योगा खूप गरजेचा आहे. योगा ही जीवन पद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात आणि सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांच्यासह योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योगा जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योगा करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे योग हे साधन आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अर्धा तास चालेल्या योगामध्ये मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव गृह विभाग सुजाता सौनिक, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधानसचिव मनिषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधानसचिव प्रविण दराडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधानसचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ****

Tuesday, 4 June 2024

40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी

*40 - उस्
मानाबाद लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी* * 4250 मतदारांनी केला नोटाचा वापर * 7953 मतदारांनी केले टपाल मतपत्रिकेतून मतदान धाराशिव दि.04 (माध्यम कक्ष) 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे सुरुवात झाली.एकूण 30 फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले. श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांचा पराभव केला.श्री.राजेनिंबाळकर या 7 लक्ष 48 हजार 752 मते पडली. निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 31 उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे. सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)(4 लक्ष 18 हजार 906),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (7 लक्ष 48 हजार 752),संजयकुमार भागवत वाघमारे,बहुजन समाज पार्टी (5 हजार 615),आर्यनराजे किसनराव शिंदे, राष्ट्रीय समाज दल (आर) (1887),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर,वंचित बहुजन आघाडी (33 हजार 402),नेताजी नागनाथ गोरे,देश जनहित पार्टी (2 हजार 336), नवनाथ विश्वनाथ दुधाळ,विश्व शक्ती पार्टी (1 हजार 135),नितेश शिवाजी पवार,हिंदराष्ट्र संघ (1 हजार 79),ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे, आदर्श संग्राम पार्टी (865),शामराव हरीभाऊ पवार, समनक जनता पार्टी (1509),शेख नौशाद इकबाल,स्वराज्य शक्ती सेना (1686), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2060),ज्ञानेश्वर नागनाथ कोळी,समता पार्टी (6472), अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष ( 1935), उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (3095),काका फुलचंद कांबळे, अपक्ष(4811),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (5715),गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (18966), नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (2108), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (731), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (677),नितीन खंडू भोरे,अपक्ष (1204) मनोहर आनंदराव पाटील,अपक्ष (1190), योगीराज आनंता तांबे,अपक्ष (1336), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (593),राम हनुमंत शेंडगे,अपक्ष (3263),विलास भागवत घाडगे,अपक्ष (610),शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (782),समीरसिंह रमेशचंद्र साळवी,अपक्ष (594), सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (1268), हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (2172) आणि नोटा (4298)असे मतदान झाले.एकूण 12 लक्ष 81 हजार 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये टपाल मतपत्रिकेच्या 7953 मतांचा समावेश आहे. निवडणूकीत विजयी झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विजयी झाल्याबद्दल भारत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले. *****