Wednesday, 5 October 2022
तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्
शारदीय नवरात्र महोत्सव-2022
तुळजापूर मंदिरात सीमोल्लंघनाचा सोहळा जल्लोषात संपन्न
उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- श्री. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला.
श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघना नंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले यावेळी सर्व भाविकांनी कूंकू आणि फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
*****
Monday, 26 September 2022
शारदीय_नवरात्र_महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ
शारदीय नवरात्र महोत्सव-2022 घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास
उस्मानाबाद, दि.26 (जिमाका) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे सोमवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपरिक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
त्यानंतर घट कलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसूनच घ्यावा, असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) योगिता कोल्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अक्षय पाटील,एस.के कदम,संजय सोंजे महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
**
Wednesday, 14 September 2022
जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम
जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घरी आरोग्य विभागाची टीम धडकणार आहे. यासाठी 1 हजार 203 पथके तयार केली आहेत. ही शोध मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)















