Saturday, 5 June 2021

                                        

       





                                                                   शिवस्वराज्यदिनाचा कार्यक्रम

जिल्हा परिषदेत उत्साहात

 

उस्मानाबाद.06(जिमाका) : उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्यदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने राज्य शासनाने आज शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.



जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास  महिला आणि बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला पंडितराव टेकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.पी.आघाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे आदी उपस्थित होते.

***

Wednesday, 19 May 2021

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1668617426860070&id=100011354850736&sfnsn=scwshmo

उस्मानाबाद,दि.19(जिमाका):-


येणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दल नागरिकांनी घाबरु नये… मुलांसाठी वेगळा वॉर्ड तयार केला आहे…. तेथे सर्व सोइेसुविधा आहेत…. जिल्हाधिकारी कोस्तुभ दिवेगावकर

Friday, 23 October 2020

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020






            उस्मानाबाद,दि.24 : शारदीय नवरात्र महोत्सवात  शनिवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

            श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.  

वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती

 

                 आज श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यामध्ये पहाटे 2 वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. व सकाळी 7 वा. 05 मि. पूर्णाहुती करण्यात आली. नंतर कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहार मध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे अनंत कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. कोल्हापूर संस्थानच्या वतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती, मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला. यावेळी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम नंदीबुवा, श्रीकृष्ण नंदीबुवा, श्रीराम नंदीबुवा, सुनील लसणे, भालचंद्र पाठक, बंडोपंत पाठक, सुमेध पाठक, शैलेश पाठक, महेश प्रयाग, मकरंद प्रयाग, प्रल्हाद पैठणकर, प्रसाद लसणे, अशोक ओवरीकर, शरद कांबळे, बाळासाहेब शामराज, संजय पाठक, रवी पाठक, नागेश शितोळे, श्री भोसले, हे उपस्थित होते,

उद्या (दि. 25 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.   

 

****