Wednesday, 11 March 2020
Sunday, 26 January 2020
“उस्मानाबाद जिल्हा रायफल असोसिएशन” चा “लोकराज्यसंस्था” म्हणून पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार
वृत्त क्र:- 51 दि.26 जानेवारी 2020
“उस्मानाबाद जिल्हा रायफल
असोसिएशन” चा “लोकराज्यसंस्था” म्हणून
पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून
सत्कार
उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- उस्मानाबादमधील विद्यार्थ्यांना
इंग्रजी भाषेची आणि शासनाच्या योजनांची
उत्तम ओळख व्हावी, म्हणून शासनाचे इंग्रजी भाषेतील मुखपत्र “महाराष्ट्र अहेड” या अंकाचे सभासदत्व
स्वीकारणाऱ्या “उस्मानाबाद जिल्हा रायफल असोसिएशन” या संस्थेचा आज संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोह प्रसंगी
पालकमंत्री श्री.गडाख यांच्या हस्ते “लोकराज्यसंस्था” म्हणून प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने आजीम
शेख,शाहीन आजीम शेख,फिरोज पल्ला, डॉ.दिग्गज दापके- देशमुख यांनी हा सन्मान
स्विकारला.
यावेळी जिल्हा
परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील,
जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय
कोलते,अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अपर पोलीस
अधीक्षक संदीप पालवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
****
Thursday, 26 December 2019
महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
वृत्त क्र:- 815 दि.26 डिसेंबर 2019
*महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन*
उस्मानाबाद,दि.26,(जिमाका)- महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे,मंदिर प्रशासनाचे श्री. झंपलवाड, श्री.इंतूले, श्री. गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)

